Kala Academy Goa :कला अकादमीच्या एका वर्गाचे छप्पर खाली कोसळण्याची बातमी हल्लीच आम्ही सार्यांनी ऐकली. ज्यांची मुले तिथे शिकतात त्यांच्या पालकांना घाबरवून टाकणारी ही बातमी होती. असा प्रसंग कुठल्याही वेळी घडू शकतो आणि काय होऊ शकते हा विचार करणे देखील भीतीदायक आहे. सुदैवाने छप्पर पडले त्यावेळी तिथे मुले नव्हती. मुले तिथे असताना असा प्रसंग घडला असता तर त्यांच्यासाठी तो अनवस्था प्रसंग असला असता. त्यांच्यापैकी एखादा जखमी होण्याचीही शक्यता होती.
माझा मुलाने हल्लीच तिथल्या संगीतवर्गात प्रवेश घेतला आहे. नूतनीकरण होण्यापूर्वी तिथले वर्ग चांगल्या स्थितीत होते असे मी सर्वांकडून ऐकते आहे. पण आता तिथली परिस्थिती वाईट आहे हे मी सांगू शकते. तिथे लागलेली गळती, वातानुकूल व्यवस्थेचा अभाव या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक बनलेल्या आहेत.
एरवीच गोव्यात वातावरण खूप आर्द्र आणि उष्ण वातावरण असते. यामुळे वर्गातही खूपच उकाडा असतो. काही मिनिटांसाठी तिथल्या शिक्षिकेला भेटायला गेलेली असताना या उकाड्याचा अनुभव मी घेतलेला आहे. विद्यार्थी तिथे साधारण 30 मिनिटे असतात मात्र त्या वातावरणात संपूर्ण वेळ वर्गात असलेल्या शिक्षिकांची स्थिती काय होत असेल? खरे तर या शिक्षकांनीही या अवस्थेबद्दल आपला आवाज उठवायला हवा.
कला अकादमी ही गोव्याची एक प्रतिष्ठित रचना आहे. तिच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले गेले आहेत. पण तिच्यात सुधारणा होण्याच्या जागी ती अधिक कशी काय बिघडली? खर्च केला गेलेला पैसा पाहता तिथल्या सोयी खरे तर जागतिक दर्जाच्या व्हायला हव्या होत्या. कला अकादमीला जगभरातून कलाकार भेट देत असतात. अनेक कार्यशाळा तिथे होत असतात.
हल्लीच चेलो संगीताची कार्यशाळा तिथे आयोजित झाली होती, ज्यात अनेक नामवंत संगीतकारांची हजेरी होती. कला अकादमीची ही दयनीय अवस्था पाहून त्यांना काय वाटले असेल? हे दुःखद नाही का? कला अकादमीसारख्या वास्तूच्या नूतनीकरणाची कामे जेव्हा कुणावर सोपवली जातात तेव्हा ती जबाबदारपूर्वक सोपवली गेली पाहिजेत. त्यातल्या कलात्मकतेचे भान त्यांना असायला हवे.
लविना सुवारीस
पाश्चिमात्य संगीत गायिका
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.