ख्रिस्तोफर डॅल्टन
सिनेमाप्रेमींसाठी रेड कार्पेट अंथरणारी ती तेजस्वी आणि ग्लॅमरस वेळ पुन्हा जवळ आली आहे. इफ्फीचे सध्याचे संचालक शेखर कपूर म्हणतात, 'इफ्फी हा जगातील चित्रपट महोत्सव वर्तुळात एक प्रमुख आकर्षण बनत चालला आहे कारण सर्वजण भारत, भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवन शैलीमुळे मोहित होत चालले आहेत.'
मला त्यांचे म्हणणे अगदी खरे वाटते. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने गोव्याला आपले कायमचे ठिकाण म्हणून निवडल्यानंतर, दोन दशके उलटून गेली आहेत. या दरम्यानच्या काळात लाखो लोकांनी या महोत्सवाला आपली उपस्थिती लावली आहे.
जागतिक पायाभूत सुविधा, अलीकडच्या काळात महोत्सवाला लाभलेली अधिक सिनेमागृहे, दृष्टिबाधितांसाठी निर्माण केलेली सुलभता, संग्रहित दुर्मिळ सिनेमा प्रिंटचा पुनर्संचय आणि प्रदर्शन, क्लोज सर्किट टेलिव्हिजनद्वारे होणारे थेट प्रक्षेपण या सर्व कौतुक करण्याजोग्या बाबी आहेत.
मुंबईच्या व्हिसलिंग वूड्स फिल्म स्कूलच्या संपादन विभागाचे प्रमुख प्रशांत नाईक म्हणतात, 'जर कोकणी चित्रपट आणि वारशाला त्यातून मोठी चालना दिली गेली आणि गोव्यातील स्थानिक चित्रपटकर्मींना त्याचा फायदा झाला तर ते फार चांगले होईल. ’
चित्रपट तंत्रज्ञान चित्रपटांना पूर्णपणे वेगळ्या पातळीवर वेगाने घेऊन जात आहे. 'काळासोबत चित्रपट सतत विकसित होत आहेत आणि इफ्फी या परिवर्तनाचा एक दीपस्तंभ म्हणून उभा आहे' असे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात. चित्रपट महोत्सवांनी आपल्या सीमा ओलांडायला सुरुवात केली पाहिजे असे अनेकांना वाटते.
उदाहरणार्थ, लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलचे महोत्सव संचालक कॅरी सोनी म्हणतात, 'गेमिंग आणि एक्सआर ही निश्चितच गतिमान प्रतिमा माध्यम्ये आहेत, ज्यांचा समावेश महोत्सवात व्हायला हवा.' मात्र जलद बदल ही नेहमीच चांगली गोष्ट असतेच असेही नाही. चित्रपट निर्माते आकाशादित्य लामा यांना वाटते, 'पूर्वीच्या काळात चित्रपटांची निवड खूप चांगली असायची.'
काही लोकांच्या मते, महोत्सवात चित्रपट पाहणे हेच सर्व काही नाही. प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या रुखसाना तबस्सुम यांना महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि एकूणच महोत्सवातील वातावरण आवडते.
तर अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते बिजया जेना या महोत्सवाचे कौतुक करताना म्हणतात, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध पटकथा लेखक, चित्रपट निर्माते आणि अभिनेते यांच्या मास्टरक्लासना हजेरी लावायची संधी मिळत असतानाच इफ्फीने नेटवर्किंग सत्रांसाठी आमंत्रित केलेल्या वितरक आणि सहनिनिर्मात्यांना भेटण्याचीही त्यात संधी असते.
2016च्या इफ्फीमध्ये पोलिश प्रतिनिधी मंडळाचा भाग असलेल्या अलेक्झांड्रा बियरनाका, आंद्रेज वाज्दा यांच्या 'आफ्टर इमेज' या महोत्सवाच्या उद्घाटनपर चित्रपट प्रदर्शनाला हजर होत्या. त्या आजही महोत्सवाचे प्रदर्शन वेळापत्रक आणि फिल्म बाजारच्या सुनियोजिततेबद्दल आठवण काढतात. महोत्सवातील मनोरंजक परिषदा, पॅनल बैठका यांचाही त्या उल्लेख करतात.
इफ्फी 2021 मध्ये, स्पॅनिश संगीतकार अल्वारो टूरियन यांचे पार्श्वसंगीत लाभलेला, १:१ आस्पेक्ट रेशोत चित्रित केला गेलेला चित्रपट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत होता. ते म्हणतात, 'महोत्सवातील प्रेक्षकांचा प्रतिसाद अविश्वसनीय होता आणि लवकरच आणखी एका चित्रपटासह भारतात परतण्याची मला इच्छा आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.