Public Safety Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

गोव्यात एक काळ असा होता, हॉटेलात तुमचे पैसे विसरले तर नंतर सहज परत मिळायचे; वाढत्या हिंसक घटना आणि मानसिकता

Public Safety Goa: शांतताप्रिय गोवा हरवत चालला आहे. गोव्यातील वाढत्या हिंसक घटना पाहता समाजाची मानसिकता बदलली आहे, असेच म्हणावेसे वाटते!

गोमन्तक डिजिटल टीम

चित्रा क्षीरसागर

माणसाच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली, की त्या माणसाचे मन अस्वस्थ होते. त्याचा परिणाम साऱ्या घरावर, घरातील सदस्यांवर होतो. हे नेहमीच प्रत्येकाने आपापल्या घरात अनुभवलेले आहे. असंच समाजाचंही असतं. मानव, पशू, पक्षी, प्राणी, झाडं, वेली, नद्या, तलाव, जमीन (अजून बरंच काही) या सर्वांमुळे समाजरचना संक्रमित होत आली आहे.

समाजात शांतता, चांगले कार्य, कायदा सुव्यवस्था यामुळे समाज प्रगत होत असतो. त्यातून बऱ्याच गोष्टी समाजाला पोषक वातावरण तयार करत असतात. एखादी घटना समाजात शांततेला तडा देणारी घडते तेव्हा संपूर्ण समाज अस्वस्थ होतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धीप्रमाणे व्यक्त होते. हळहळ व्यक्त करतो. हे लिहिण्याचे कारण अलीकडेच गोव्यात घडलेल्या घटना. त्या घटनांमुळे संपूर्ण गोवा हळहळला. व्यक्त झाला.

माणसं हल्ली आपला संयम हरवत चालली आहेत. हे या घटनेवरून लक्षात येते. समाज खूप हिंसक (व्हायोलंट) होत आहे. त्याची सहनशीलता संपत चालली आहे. पृथ्वीवर माणूस हा एकमेव बुद्धिमान प्राणी आहे. हा गुण जनावरात नाही. परंतु समाजात काही घटना अशा घडत आहेत, की जनावरांनीदेखील खाली मान घालावी.

या घटनांचा छडा लागेलही परंतु समाज अशा घटनांमुळे रसातळाला चालला आहे की काय, अशी शंका येते. एरव्ही गोवा शांतताप्रिय आहे. गोव्यात जातीयवाद नाही. धार्मिक तेढही नाही. एक काळ असा होता, की समजा तुमचे पैसे एखाद्या ठिकाणी पडले किंवा वस्तू पडली किंवा हॉटेलात विसरलात तर तुम्ही नंतर जाऊन पाहिले तर ती वस्तू तुम्हांला सहीसलामत परत मिळत असे. परंतु आज हे चित्र तसे राहिले नाही. का बरं?

गोवा खूप अस्वस्थ झाला आहे. आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. रोज बातम्यांतून ते वाचायला मिळते. झाडीत कुजलेला मृतदेह सापडला, कुठे बलात्कार झाला आणि जिवे मारले, अपहरण झाले. एका रविवारी तर चार वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह सापडले. कुणीही गोव्यात यावे. मजा करावी आणि साथीदाराला मारून टाकून त्याचा मृतदेह झाडीत फेकून द्यावा.

एका दैनिकात बातमी प्रसिद्ध झाली की साडे आठ महिन्यात २० खून झाले. मला प्रश्न पडतो की मरण एवढे स्वस्त झाले आहे का? एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर भर दुपारी हल्ला होतो. त्याच्या साथीदाराला चाकू दाखवला जातो. गोव्यात सामान्यजनांची सुरक्षितता कायम राहिली नाही, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या आणि बलात्काराच्या संख्येत तर भरमसाट वाढ झाली आहे. महिलांचे शोषण आणि पुरुषांवरील अत्याचाराच्या घटना घडल्याचे वाचायला मिळत आहे.

समाजात अस्वस्थता आहे. प्रत्येक जण म्हणतो, आपण सुरक्षित नाही. आज त्यांच्या दारात आलं आहे, उद्या माझ्या दारात येणार आहे. मंगळसूत्र चोरी, घर फोडणे, दुकान फोडणे, दुकानदाराला पैशासाठी जिवे मारणे, तलवारी, चाकू, सुरे, बंदुका घेऊन सराईतपणे गुन्हेगार फिरत आहेत. कायद्याची भीती कुणाला राहिली नाही, असा संदेश समाजात गेला आहे. एक काळ असा होता, पोलिस दिसला की आम्ही ‘जय हिंद पोलिसमामा’ असं म्हणायचो.

किती विश्वास होता खाकी वर्दीतल्या या माणसाचा. आता मात्र हे रक्षकच भक्षक वाटायला लागले आहेत. कुंपणच जर शेत खात असेल तर काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरक्षिततेची हमी काय मागायची. न्याय कोणाला मागायचा. समाजाचे अधःपतन होत आहे. आपण कोणत्या दिशेला जात आहोत, हे पुन्हा एकदा तपासून पाहण्याची वेळ आली आहे.

निसर्गाप्रति, पर्यावरणाप्रति, समाजाप्रति, मुक्या जनावरांप्रति चांगली भावना निर्माण व्हावी, समाजाचं भलं व्हावं, समाजातील दीन दुबळे, वंचित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून कार्य करणे ही विचाराची चळवळ आपण मारू शकत नाही. ज्या अनिष्ट प्रथा आहेत, जी मुजोरी चालली आहे त्याविरुद्ध आवाज उठवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

वाईट गोष्टींना विरोध असणे हे समाज जिवंत असण्याचे लक्षण आहे. विरोध असलाच पाहिजे. तोच आवाज आपण जर मोडीत काढत असू तर समाजात चांगुलपणाची सूज येत राहील आणि हे घातक आहे. विचाराने विचारांची देवाणघेवाण व्हावी, चर्चा प्रतिचर्चा व्हावी. पुढील व्यक्तीलाही आपले मत ठामपणे मांडण्याचा अधिकार आहे, हे मान्य करायला हवे, आपण हा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असू तर समाजाच्या प्रचंड क्षोभाला सामोरे जावेच लागेल, हे निश्चित आहे.

महिलांवर बलात्कार, अपहरण, पर्यावरणाचा र्‍हास, मारहाणीची वाढती प्रकरणे, म्हादई प्रकरण, पर्यटकांवरील मारहाण थांबवली पाहिजे. आणि पर्यटकांनीही जबाबदारीने वागले पाहिजे. ड्रग्ज, कसिनो, कोकेन, गुंडगिरी थांबली पाहिजे. व्याघ्र प्रकल्प व्हायला हवा. जंगलतोड थांबायला हवी, पर्यावरणा रक्षण व्हायला हवे. समाजाने संयमाने वागायला हवे. शांतताप्रिय गोवा हरवत चालला आहे. गोव्यातील वाढत्या हिंसक घटना पाहता समाजाची मानसिकता बदलली आहे, असेच म्हणावेसे वाटते!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: नवरात्रीसाठी फ्लाईटमुळे उशीर झाला गुजराती प्रवाशांनी 'गोवा' विमानतळावरच सुरु केला गरबा; पायलट, हवाई सुंदरीही थिरकल्या Watch

Pakistan Cricket Team: आशिया कपमधील 'अपमानास्पद' पराभव! पीसीबीने घेतला मनावर, 'फ्लॉप शो'मुळे खेळाडूंवर केली कारवाई

Quetta Blast: पाकिस्तानातील क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; 10 जणांचा मृत्यू, 32 हून अधिक जखमी Watch Video

मनोज परब अडचणीत, मंत्री हळर्णकरांशी हुज्जत भोवली; कोलवाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार; कधी अन् कुठे होणार सामना? एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT