Congress Goa Forward Alliance Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Congress Goa Forward Alliance: युतीवरून काँग्रेसमध्येच मतभेद? गिरीश म्हणाले, ‘ते पुढे आल्यास आम्हीही तयार’, युरींचा सावध पवित्रा

Girish Chodankar Alliance Talks: युतीची बोलणी आम्ही नव्हे गोवा फॉरवर्ड पक्षाने स्थगित ठेवली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: युतीची बोलणी आम्ही नव्हे गोवा फॉरवर्ड पक्षाने स्थगित ठेवली आहेत. गोवा फॉरवर्डने जर ही स्थगिती मागे घेतली तर आम्ही आमची बोलणी सुरू करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली तर जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी वाटाघाटी करण्याची ही वेळ नव्हे. स्वतःचे नव्हे तर गोव्याचे हित लक्षात ठेवून सर्वांनी निर्णय घ्यायला पाहिजेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.

कोकणी भाषा राष्ट्रमान्यता दिनाचे औचित्य साधून ग्लोबल रोमी लिपी अभियान या संघटनेने आयोजित केलेल्या सांगीतिक कार्यक्रमाला चोडणकर आणि आलेमाव हे मडगाव येथे एकत्र आले असता पत्रकारांनी त्यांना विरोधकांच्या महाआघाडी संदर्भात विचारले असता, दोन्ही नेत्यांनी अशी उत्तरे दिली.

चोडणकर म्हणाले, काँग्रेसला अशी महाआघाडी हवी आहे, त्यामुळे आम्ही ‘आरजी’ व ‘आप’ या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे बोलणी सुरू केली आहे आणि त्या संदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. गोवा फॉरवर्डकडे होणारी बोलणी आम्ही नव्हे त्यांनी स्वतः बंद केली आहेत.

ही स्वप्ने मूर्खपणाची!

विजय सरदेसाई यांना दूर ठेवून आम्ही भाजपला हरवू आणि आपले सरकार सत्तेवर आणू, असे जर कुणाला वाटत असेल तर ते मूर्खपणाचे ठरेल. विजय नसताना भाजपला हरविणे कठीण, असे मत सामाजिक आणि राजकीय चळवळीतील कार्यकर्ते अँथनी डिसिल्वा यांनी व्यक्त केले. ‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘साष्टीकार’ या कार्यक्रमात ते बोलत होते. २०२२ च्या निवडणुकीपासून काँग्रेसने धडा घेतला नाही तर ते आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेणार हे निश्चित, असे डिसिल्वा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT