St Francis Xavier Controversy Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अशा खट्टरांची पूजा खेटरांनीच करा- संपादकीय

St Francis Xavier Controversy Goa: बेताल बोलणारे काही गोव्याबाहेरचे तर काही गोमंतकीय; पण असे येतात किती आणि जातात किती, त्यांची गणती गोंयकार ठेवत नसला तेवढ्या वेळेपुरता गोवा अस्थिर करण्याचे काम ते निश्‍चित करतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

बेताल बोलणारे काही गोव्याबाहेरचे तर काही गोमंतकीय; पण असे येतात किती आणि जातात किती, त्यांची गणती गोंयकार ठेवत नसला तेवढ्या वेळेपुरता गोवा अस्थिर करण्याचे काम ते निश्‍चित करतात. म्हणूनच अशांची व्यवस्थित दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार, असा जरी असला तरी तो अमर्याद नसतो. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचा उपयोग करताना दुसऱ्याच्या सन्मानाला, सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचणार नाही, याची जाणीवही असावी लागते, जी कडव्या विचारसरणीला अस्पृश्य असावी. कोणत्याही जयंती कार्यक्रम त्या-त्या विभूतीची थोरवी गायली जाते, त्यास हरकत नसावी.

परंतु एकाचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी अन्य कुणाच्या श्रद्धेला ठेच पोहोचविण्याचा कुणाला बिलकूल अधिकार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ ‘मला जे वाटते ते बोलणे’ हा नाही. ‘मी जे बोलतो त्याचा समाजावर काय परिणाम होईल’, याची जाणीव ठेवून बोलणे असा व्यापक आहे. परंतु धर्मांध विचारसरणीच्या सडक्या बुद्धीला याच्याशी काहीच देणेघेणे नसते.

वर्षानुवर्षे धार्मिक सलोखा सांभाळणाऱ्या गोव्यात अलीकडे वरचेवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. कधी छत्रपती शिवरायांसंदर्भात बेताल वक्तव्ये, तर कधी सेंट फ्रान्सिस झेविअरचा विषयक उपमर्द करणाऱ्या टिपण्या. परशुराम जयंतीनिमित्त वास्कोत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गौतम खट्टर नामक उजव्या विचारसरणीच्या वक्त्याने सेंट फ्रान्सिस झेविअर संदर्भात अपशब्द उच्चारत गरळ ओकल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला सरकारातील मंत्री, आमदार असूनही सामाजिक सौख्याचे भान हरवण्याइतपत टोकाच्या विचारसरणीचा धीर चेपला. कोण हा खट्टर? तो आहे काही व्ह्यूव्जसाठी जीभ पाझळणारा एक यूट्यूबर.

शनिवार सांयकाळपर्यंत गोव्यात फारसे त्याला कुणी ओळखतही नव्हते. भाषणात परशुरामाची महती उलगडणे समजू शकते; पण फ्रान्सिस झेविअरवर घसरण्याची काहीही गरज नव्हती. ज्या गोव्याच्या भूमीत तो उभा होता, त्याचा पाया समतेवर बेतला आहे. सेंट फ्रान्सिस झेविअरला जसे ख्रिस्ती भजतात, तसेच हिंदूही मानतात. ‘सायबा पाव’ म्हणणारे हिंदू कमी नाहीत.

जुने गोवे येथील फेस्ताचे अर्थकारण हिंदू विक्रेत्यांभोवती फिरते, नवस फेडण्यासाठी करण्यात येणारे ‘मेणाचे हात’ साकारणारे कित्येक कारागीर हिंदूच आहेत. अर्थात द्वेषमूलक विधाने करणाऱ्यांना वास्तवाशी घेणेदेणे नसतेच मुळी. मग ते भिडे गुरुजी असोत, वेलिंगकर असोत, प्रमोद मुतालीक असो वा फादर बोलमॅक्स. काही गोव्याबाहेरचे तर काही गोमंतकीय; पण असे येतात किती आणि जातात किती, त्यांची गणती गोंयकार ठेवत नसला तेवढ्या वेळेपुरता गोवा अस्थिर करण्याचे काम ते निश्‍चित करतात. म्हणूनच अशांची व्यवस्थित दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT