Goa Assembly Elections 2027 Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: 'आप' आणि 'आरजी' समोर काँग्रेस लोटांगण घालणार? अस्तित्वासाठी विरोधकांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही!

Goa Assembly Elections 2027: २०२२ च्या निवडणुकीत ‘आरजी’चा जरी एकच उमेदवार जिंकून आला, तरी काँग्रेसचे आठ उमेदवार त्यांच्यामुळे जिंकण्यापासून दूर राहिले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सुशांत कुंकळयेकर

२०२२ च्या निवडणुकीत ‘आरजी’चा जरी एकच उमेदवार जिंकून आला, तरी काँग्रेसचे आठ उमेदवार त्यांच्यामुळे जिंकण्यापासून दूर राहिले. दुसऱ्या बाजूने ‘आप’ने आपले दोन आमदार निवडून आणून काँग्रेसच्या भरवशांच्या सासष्टीला खिंडार पाडले.अशा या स्थितीत आता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ही मत विभागणी होऊ नये, यासाठी काँग्रेसचे धोरण काय असेल हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात भाजपला फारसे पोषक वातावरण नव्हते. याचा अंदाज आल्याने मायकल लोबो वैगरेंनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. भाजपच्या आमदारांचे संख्याबळ एकेरी आकड्यावर येऊन थांबू शकते, असा अंदाज त्यावेळी राजकीय पंडित व्यक्त करत होते. पण त्यावेळी आरजी पार्टी हा पक्ष मैदानात उतरला. या पक्षाने थोडीथोडकी नव्हे तब्बल १० टक्के मते घेतली आणि काँग्रेसचे सर्व मनसुबे ढासळले.

अत्यंत नाजूक स्थिती असतानाही केवळ मत विभागणीच्या जोरावर भाजपने गोव्यात सहजरित्या सत्ता संपादित केली. त्यानंतर काँग्रेसमध्ये जे काही प्रभावी आमदार शिल्लक होते, त्यांनाही आपल्या बाजूने ओढत गोव्यात काँग्रेसची स्थिती अगदीच कमकुवत करून टाकली. २०२२ च्या निवडणुकीत ‘आरजी’चा जरी एकच उमेदवार जिंकून आला, तरी काँग्रेसचे आठ उमेदवार त्यांच्यामुळे जिंकण्यापासून दूर राहिले.

दुसऱ्या बाजूने ‘आप’ने आपले दोन आमदार निवडून आणून काँग्रेसच्या भरवशांच्या सासष्टीला खिंडार पाडले. अशा या स्थितीत आता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ही मत विभागणी होऊ नये, यासाठी काँग्रेसचे धोरण काय असेल हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. काल एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा फॉरवर्ड बरोबरची युती कायम असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘आरजी’ व ‘आप’शीही जुळवून घेण्याची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष सरदेसाई यांनीही अजून आम्ही युतीतील भागीदार आहोत, हे स्पष्ट केले आहे. ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नायक यांनीही युतीची भाषा सुरू केली आहे. राहता राहिला प्रश्न आरजी पक्ष काय करणार हा? सध्या ‘आरजी’तही अंतर्गत वाद असून निवडणूक येईपर्यंत हा पक्ष त्यातून बाहेर पडणार का हे पहावे लागेल. ‘आप’ आणि ‘आरजी’ या दोन्ही पक्षांचा जनाधार सध्या कमी झाला आहे,पण या पक्षांशी जुळवून घेण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही हेही खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजे देश अस्थिर करणाऱ्यांची ‘बी-टीम’, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार!

Chandra Gochar 2026: मानसिक शांतता आणि ऐश्वर्याचा मिलाफ! 5 राशींना मिळणार बँक बॅलन्स वाढवण्याची सुवर्णसंधी; महालक्ष्मीची कृपा

ICC Womens T20 Ranking: 12 महिन्यांचा प्रवास अन् ऐतिहासिक शिखर! भारताची 21 वर्षीय एन श्री चरणी बनली जगातील नंबर-1 टी-20 गोलंदाज

Benjamin Netanyahu vs Donald Trump: ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर! 'आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही'; नेतन्याहूंचा थेट पलटवार VIDEO

दोन महिन्यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप अन् 3 खून! बॉयफ्रेंडच्या मदतीनं तरुणीनं आई-वडिल अन् लहान बहिणीचा काढला काटा; बंगळुरु हादरलं

SCROLL FOR NEXT