Global child protection day Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Child Abuse Awareness: गोव्यात एका वर्षात 202 बालकांवर अत्याचार; दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज

Global child protection day: चिंताजनक बाब म्हणजे अशा प्रकरणात गोव्यात, शाळा ते महाविद्यालयीन पातळीपर्यंतच्या आठ शिक्षकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

लैंगिक बाल शोषण आणि हिंसाचार प्रतिबंध व उपचार यासाठी जागतिक दिन दरवर्षी १८ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या समस्यांविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर लैंगिक बाल शोषणाविरुद्ध कारवाई करण्यास प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 

गेल्या वर्षीच्या अहवालानुसार आपल्या गोव्यात बाल अत्याचारांची घटना सरासरी दररोज घडते. नोंदण्यात आलेल्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये लैंगिक हिंसाचार, अपहरण, हल्ला आणि अपशब्दांचा वापर यांचा समावेश होता. गेल्या दहा वर्षांमध्ये अशा प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१४मध्ये फक्त २०२ प्रकरणे नोंदवली गेली होती. 

चिंताजनक बाब म्हणजे अशा प्रकरणात गोव्यात, शाळा ते महाविद्यालयीन पातळीपर्यंतच्या आठ शिक्षकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

आकडेवारीवरून असे दिसून येते की अशा गुन्ह्यांचे बळी ठरणारी जवळपास ५०% मुले साधारण पंधरा वयोगटातील असतात. राज्यात किशोरवयीन गर्भधारणेमध्ये होणारी वाढ देखील चिंतेची बाब आहे.

म्हणूनच या मुलांना अशा गुन्ह्यांविरुद्ध सामना करण्यासाठी आणि त्यांना त्यातून सावरण्यासाठी मदत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज समाजमाध्यमे ही किशोरवयीनांसाठी महत्त्वाचे धोके बनले आहेत. समाजमाध्यमे वापरण्यासाठी सरकारने वयोमर्यादा लागू करावी असेही अनेकांना वाटते तसेच पिडीतांना पाठबळ मिळावे यासाठी सरकारने स्थानिक स्वयंसेवी संस्थांशी सहकार्य करणे खूप गरजेचे आहे असेही अनेकांचे मत आहे. 

या सर्व दृष्टीने आजचा १८ नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा ठरतो कारण संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषित केलेला हा दिवस मुलांवरील सर्व प्रकारच्या लैंगिक हिंसाचाराला प्रतिबंधित करण्याचे, त्यांचे उच्चाटन करण्याचे आणि पीडितांच्या उपचारांना आणि हक्कांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. 

स्थानिक स्तरावरच नव्हे तर जागतिक स्तरावर असंख्य किशोरवयीन मुले गैरवर्तन आणि शोषणाला बळी पडत असतात. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारच्या लैंगिक शोषण आणि हिंसाचाराचा सामना विशेषतः मुलींना जास्त करावा लागतो.‌

अशाप्रकारच्या अत्याचारातून वाचलेले अनेक पीडित आपल्यावरचा अन्याय कधीही उघड करायला किंवा न्याय मागायला जात नाहीत कारण त्यांना लाज वाटते. बाल शोषणाच्या अनुभवाचा परिणाम अनेकांवर शारीरिक आणि मानसिक या दोन्ही स्तरांवर होतो आणि त्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात. 

मुलांविरुद्धच्या दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, मुलांना त्यासंबंधी शिक्षित करणे हे खूप महत्त्वाचे आहे. मुलांचे न्याय सुनिश्चित करण्यासाठी सतत कृती आवश्यक आहे. आजचा दिवस आपल्याला हेच सांगतो.

सपना मानकर

पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Oppo Find X9 Pro भारतात लाँच; 7500 mAh बॅटरी आणि 200 MP कॅमेरासह मिळणार तगडे फीचर्स, किंमत फक्त...

Rohit Sharma: 'हिटमॅन' इज बॅक! एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा करणार संघाचे नेतृत्त्व

रिलेशनशीप, मोबाईलवरुन वर्गात अपमान केला, मानसिक धक्का बसलेल्या 17 वर्षीय मुलीने शाळाच सोडली; गोव्यात शिक्षकाविरोधात गुन्हा

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

मी आयुष्याला कंटाळलीये! जीवन संपविण्यासाठी महिलेने गोव्याच्या समुद्रात घेतली उडी, जीवरक्षकाने दिले जीवदान

SCROLL FOR NEXT