GMC  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: विद्युत कारणांमुळे आगी लागाव्यात, इतकी रुग्णालये असुरक्षित का बनतात?

Healthcare Facilities: सरकारी रुग्णालयांतील व्यवस्थेत सुधारणा याच परिघात सरकारी रुग्णालयांतील विद्युत सुरक्षा हाही महत्त्वाचा विषय आहे. त्यावर प्रकाश टाकणारा विवेक सरदेसाई आणि जेरोमिनो लोबो यांचा लेख.

गोमन्तक डिजिटल टीम

विद्युत सुरक्षा ही आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे, जो रुग्णसेवा, उपकरणांची कार्यक्षमता आणि कामकाजाचे सातत्य यांच्याशी खोलवर जोडलेला आहे. अलीकडच्या काळात आपण रुग्णालयांमध्ये घडलेल्या आगीच्या अनेक घटना पाहिल्या आहेत.

बहुतेक वेळा आग इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे लागते. यामुळे रुग्णालयांमध्ये विद्युत कारणांमुळे होणाऱ्या घटना कमी/नगण्य करण्यासाठी मानक आणि प्रघात संहितेनुसार रुग्णालयांमधील विद्युत पायाभूत सुविधांची रचना, अंमलबजावणी, लेखापरीक्षण आणि देखभाल करणे महत्वाचे ठरते.

विद्युत कारणांमुळे आगी लागाव्यात, इतकी रुग्णालये असुरक्षित का बनतात?

अतिदक्षता विभागात ऑक्सिजन समृद्ध क्षेत्रे असतात. ज्वलनासाठी आवश्यक- इंधन कशामुळे पेटते - इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन हे घटक (अग्नी त्रिकोण) हे सर्व घटक अतिदक्षता विभागात मुबलक प्रमाणात असतात. रक्त, सलाईन, पाणी इत्त्यादींच्या ओलाव्याने रुग्णालयात शॉक लागण्याची शक्यता जास्त असते.

अनेक जीवनरक्षक उपकरणे त्वचेला बायपास करतात. त्वचा वीज प्रवाहाला मूलभूत प्रतिकार करते. जेव्हा त्वचेची विद्युतविरोधी प्रतिकारशक्ती उपकरणांकडून बायपास केली जाते तेव्हा शॉकचा धोका वाढतो.

व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर आणि शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणार्या वैद्यकीय उपकरणांना स्थिर आणि नियमित वीज पुरवठ्याची आवश्यकता असते. विद्युत पुरवठ्यात बिघाड किंवा व्यत्यय आल्यास रुग्णांचे जीवन धोक्यात येऊ शकते. त्यांच्या सेवेत खंड पडू शकतो.

रुग्णालयातील एअर कंडिशनरसह विद्युत उपकरणे, बिछान्यावर असलेल्या चादरी, वापरलेली रसायने आणि ऑक्सिजन, यांचे एका जागी असणे आग पसरवण्यासाठी उपयुक्त ठरते. जर बिघाडामुळे विद्युत ठिणगी निर्माण झाली आणि सेफ्टी ट्रिप सर्किट्स विद्युत पुरवठा खंडित करण्यात अयशस्वी ठरले, तर आग लागणे अपरिहार्य असते. अशा आपत्कालीन परिस्थितीत जीवनरक्षक उपकरणाच्या आधारावर असलेल्या रुग्णांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवणे खूपच जिकिरीचे असते व त्यांच्या जिवावर बेतणारे ठरू शकते.

जर रुग्णालयातील विद्युतपुरवठ्यात व्होल्टेज वाढणे अथवा कमी होणे, विद्युत दाब कमी येणे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप असेल तर चांगल्या दर्जाची विजेची गरज असलेली संवेदनशील यंत्रसामग्री, उपकरणे यांच्या कामात अडथळा येऊन ती बिघडतात, चुकीचे अहवाल येतात. यासाठी नियमित, योग्य प्रकारे देखभाल केलेली विद्युत प्रणाली अत्यावश्यक आहे.

नवीन रुग्णालयांनी डिझाइन आणि अंमलबजावणीच्या टप्प्यात असताना विद्युत सुरक्षा नियम आणि प्रघात संहिता यांचे पालन करणे काळाची गरज आहे आणि विद्यमान रुग्णालयांनी, रुग्णालयाच्या ऑडिटमध्ये तज्ज्ञ असलेल्या प्रतिष्ठित एजन्सीकडून त्यांच्या परिसराचे लेखापरीक्षण (ऑडिट) करावे आणि विद्युत प्रणालींमधील सर्व त्रुटी ओळखून त्या दुरुस्त कराव्यात.

राष्ट्रीय विद्युत संहिता २०२३मध्ये रुग्णालयाच्या विद्युत वायरिंगचा स्पष्ट उल्लेख आहे, जो सर्व प्रकारच्या विद्युत प्रतिष्ठापनांसाठी अनिवार्य आहे. तसेच रुग्णालयाच्या सुरक्षा स्थापनेसाठी स्वतंत्र कोड IS १७५१२ आहे.

काही महत्त्वाचे पैलू ज्यांकडे लक्ष दिले गेले पाहिजे परंतु ते केवळ त्यापुरते मर्यादित नाहीत. ते म्हणजे :

मानकांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांनुसार योग्यरीत्या डिझाइन आणि अंमलात आणलेल्या समान बंधनासह अर्थिंग सिस्टम. - CEA नियमन ४३ अनुसार

अग्निरोधक कमी धूर शून्य हॅलोजन (FRLSZH) आणि योग्य वायरिंग आणि केबलिंग पद्धतींसह स्थिर स्थापनेत वर्ग २ तारांचा वापर करणे श्रेयस्कर आहे.-CEA नियम ३८ अनुसार

MCBs, RCDS, SPDs, सर्किट ब्रेकर्स, इन्सुलेशन मॉनिटरिंग डिव्हाइसेस इत्यादी संरक्षणात्मक उपकरणांचा योग्य वापर

विद्युत प्रणालींची योग्य रचना, संरक्षणात्मक उपकरणांची निवड आणि समन्वय, योग्य तपशीलांसह सामग्रीचा वापर आणि डिझाइननुसार अंमलबजावणी सुनिश्चित करणे.

गट २ स्थानांसाठी वैद्यकीय आयटी प्रणालींचा वापर.- NEC २०२३ भाग ३ कलम ९ अनुसार .

विशेषतः क्रिटिकल केअर आणि संवेदनशील उपकरणांना चांगल्या दर्जाचा आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणे.

नवीन वैद्यकीय उपकरणे कार्यान्वित करण्यापूर्वी आणि योग्य कार्य आणि सुरक्षिततेसाठी नियमित देखभालीनंतर वापरासाठी परत येण्यापूर्वी त्यांची योग्य तपासणी करण्यात यावी.

वर्ग ०, वर्ग १ आणि वर्ग २ नुसार वैद्यकीय स्थानांचे वर्गीकरण आणि वरील वर्गीकरणानुसार वैद्यकीय उपकरणांचे योग्य विद्युत डिझाइन आणि वापर. -NEC २०२३ भाग ३ कलम ९ आणि परिशिष्ट B अनुसार

महत्त्वाचे नियम आणि प्रघात संहिता ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे/करता येते परंतु यांचे पालन त्यापुरते मर्यादित नाही

CEAR २०२३

NEC २०२३

NBC २०१६

IS १७५१२ - वैद्यकीय ठिकाणी विद्युत स्थापनेसाठी आवश्यकता

IEC ६०६०१ आणि IS १३४५० - वैद्यकीय विद्युत उपकरणे

IS ७३२ - विद्युत वायरिंग स्थापनेसाठी आचार संहिता.

IS १८७३२ - इमारतींमध्ये विद्युत स्थापनेच्या मानकांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक

योग्य विद्युत प्रणाली सुनिश्चित करून आपण आपल्या रुग्णालयांना, आजारातून बरे होण्याचे सुरक्षित ठिकाण बनवूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT