Corona In Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

चीनच्या प्रयोगशाळेतील कुपी कलंडली, जगात हाहाकार उडाला; कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक

Corona Cases Goa: आपल्या देशात जे एन-१ हा विषाणू प्रथम दिल्लीत आणि नोयडात आढळून आला तेथून तो इतर राज्यात पोहोचला. कालपर्यंत या विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या ७,३८९वर पोहोचली होती.

Sameer Panditrao

जयराम अनंत रेडकर

कोविड - १९ या विषाणूच्या छायेखाली २०२१ आणि २०२२ ही दोन वर्षे गेली. दोन वर्षे सारे जग जणू स्तब्ध झाले होते. चीनमधील एका प्रयोगशाळेतील द्रव्ययुक्त कुपी कलंडली आणि तिथून प्रथम ही विषाणूची लागण सुरू झाली असे बोलले जाते. त्या विषाणूने सगळे जग अल्पावधीत व्यापून टाकले. त्याचे रौद्ररूप आठवले तरी भयाने अंगावर काटा येतो.

या विषाणूवर तेव्हा प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती. ती तयार करण्यासाठी संशोधकांनी कंबर कसली आणि कोविड प्रतिबंधक लस शोधली. (एका संधिसाधू बाबाने आपत्तीत संधी शोधत ‘कोरोनील’ हे औषध बाजारात आणले आणि अमाप पैसा कमावला. ज्याची गुणवत्ता रोगप्रतिकार मानांकनात बसत नव्हती.

प्रकरण उघडकीस आले तेव्हा हे औषध बाजारातून गायब करण्यात आले) मात्र तोपर्यंत हजारो लोक मृत्युमुखी पडले. जगात हाहाकार उडाला होता. आता त्याच विषाणूचा नव्या रूपात अवतार झाला आहे. हाँगकाँग येथे या जेएन.१ या विषाणूची सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता हा विषाणू जगभर पसरायला सुरुवात झाली.

यातही आणखी काही विषाणूच्या प्रजाती आढळून यायला लागल्या आहेत. त्यातील एन बी.१.८.१ हा विषाणू लहान मुलावर आघात करतो. अमेरिकेत या विषाणूमुळे अनेक मुले दगावल्याच्या बातम्या येत आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने जाहीर केलेल्या कोविड-१९ची आणखी एक प्रजाती एल एफ .७ ही आपल्या अहवालात दाखविलेली आहे.

आपल्या देशात जे एन-१ हा विषाणू प्रथम दिल्लीत आणि नोयडात आढळून आला तेथून तो इतर राज्यात पोहोचला. कालपर्यंत या विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या ७,३८९वर पोहोचली होती. केरळ राज्यात बाधित रुग्णांची संख्या सर्वांत अधिक २००७ आहे.

त्या खालोखाल गुजरात - १,४४१, पश्चिम बंगाल - ७४७, दिल्ली - ६८२, महाराष्ट्र -५७८, कर्नाटक- ५७३, उत्तर प्रदेश-२३८ अशी आकडेवारी दाखवण्यात आली आहे. मिझोराम आणि त्रिपुरा येथे अद्याप कोरोनाची एकही केस आढळलेली नाही. गेल्या ४८ तासात देशात ७६९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ९३ रुग्ण दगावले आहेत.

महाराष्ट्रातील पुणे, मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात बाधितांची संख्या अधिक आहे. गोव्यातही आठ बाधित रुग्ण मिळाले आहेत असे बोलले जाते पण आरोग्य खात्याकडून किंवा गोवा सरकारकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तरी देखील विषाणू प्रसाराचा वेग पाहता आपण सावध राहणे आवश्यक आहे.

टाळ्या, थाळ्या आणि डबे बडवून हा रोग थांबणारा नाही किंवा ’गो कोरोना गो’ म्हणून तो जाणारा नाही. असले हास्यास्पद उपाय कुणी करू नयेत. त्या ऐवजी शास्त्रीय उपाय योजना करणे आवश्यक आहे. मूलतः प्रत्येकाने जास्तीतजास्त वैयक्तिक आणि परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

जिथे घाण तिथे रोग हे ठरलेलेच असते. म्हणून स्वच्छता हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. तोंडावर मास्क लावणे, हात धुताना सॅनिटायरझचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळणे, बाहेरून आल्यावर सचैल स्नान करणे, विशेषतः नाक, कान, डोळे यांना साबण लावून आंघोळ करणे, बाहेरून आल्यावर अंगावरचे कपडे साबणाच्या पाण्यात काही काळ बुचकळून ठेवणे आणि नंतर धुणे, आंघोळ केल्याशिवाय घरातील कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श न करणे, सकस आहार घेणे आणि जोडीला योगासने करणे अशी पथ्ये पाळली तर आपण या नवीन विषाणूपासून दूर राहू शकू.

सतत शिंका येणे, नाक गळणे, उलटी होणे, मळमळणे, ताप येणे, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण घटून श्वासोच्छ्वास करायला कठीण होणे ही लक्षणे आढळली तर लगेच वैद्यकीय तपासणी करून घेणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. लहान मुले आणि वृद्ध यांना या विषाणूची जलद लागण होते कारण त्यांची प्रतिकार शक्ती नाजूक किंवा कमकुवत असते. म्हणून अशा वयोगटातील लोकांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरते.

गोवा सरकारने यासाठी काही पावले त्वरित उचलली पाहिजेत. पहिले म्हणजे राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची एन्ट्री पॉइंटला तपासणी केली जावी. जसे की, रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्थानक इत्यादी!

सडकमार्गे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी वेशीवरच केली जावी आणि विषाणू बाधित व्यक्ती आढळल्यास एक तर त्याला आहे तिथून माघारी पाठवणे किंवा त्याची क्वारंटाईन केंद्रात रवानगी करणे हे दोनच पर्याय उरतात.

देश विदेशातील पर्यटकावरदेखील काही बंधने घालावी लागतील. असे केले तरच आपले राज्य या विषाणूपासून वाचू शकेल. त्याचप्रमाणे ‘विषाणू येईल तेव्हा तेव्हा’ पाहू असा विचार न करता, आता पासूनच क्वारंटाईन केंद्रे, स्वतंत्र वैद्यकीय सेवा कक्ष आणि आवश्यक गोष्टींची तयारी करून ठेवायला पाहिजे. इस्पितळे सुसज्ज असली की ऐनवेळी धावाधाव करावी लागणार नाही आणि मृत्यूचे प्रमाण आटोक्यात राहील.

कोविड काळात बाधा झालेल्या लोकांची काय हालत झाली होती हे आठवून पाहा. नोकरी धंद्यासाठी परगावी गेलेले कामगार आपल्या बायका पोरांसह शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत निघाले होते (कारण प्रवासासाठी वाहने उपलब्ध नव्हती.)

तहान भुकेने व्याकूळ होऊन यातील अनेकजण वाटेतच मरण पावले होते. जे कसेबसे जिवंतपणी आपल्या गावापर्यंत पोहोचले त्यांना आपल्याच गावच्या वेशीबाहेर ठेवण्यात आले होते. कोविड बाधित झाल्याच्या संशयाने डॉक्टर विषाणू बाधित लोकांना दुरूनच सल्ला देत असत, इस्पितळात दाखल केलेल्या बाधित रुग्णाला तपासायचे असेल तर बॉम्ब शोधक कर्मचारी जसा वेश परिधान करतात तसा वेश परिधान करूनच डॉक्टर रुग्णाची तपासणी करून त्याच्यावर इलाज करीत असत.

(विमान प्रवास करतानादेखील प्रवाशांना असाच वेश काही वेळा परिधान करावा लागत असे) एखादा रोगी दगावला तर त्याचा मृतदेह, कापडी पट्ट्यांनी गुंडाळून तो थेट स्मशानभूमीत किंवा दफनभूमीत न्यावा लागत असे. जवळचे आणि दूरचे नातेवाईक किंवा मित्रदेखील भीतीपोटी मृतदेहाच्या जवळपास येत नसत.

अक्षरशः मृत पावलेल्या व्यक्तीला बेवारस स्थितीत दहन किंवा दफन त्रयस्थांकडून केले जात असे. अशावेळी जात, धर्म, उच्चनीचता या गोष्टी बाजूला पडल्या होत्या. अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी हिंदू मृत देहाला भडाग्नी दिला होता.

उत्तर प्रदेशात दहन करायला स्मशानभूमी अपुरी पडली तेव्हा मृतदेह नदीकिनारी वाळूत पुरले गेले, काही गंगेत सोडले गेले, नरभक्षक प्राण्यांनी हे वाळूत पुरलेले मृतदेह उकरून काढून त्यांचे लचके तोडले. मृतदेहाची ही विटंबना होती. असे देह कुजले आणि नवीनच समस्या उद्भवली अशा प्रकारच्या बातम्या त्यावेळी आपण टीव्हीवर पाहत होतो. ती दृश्ये भयावह होती. तो करुण, भयावह आणि अस्वस्थ करणारा अनुभव पुन्हा घ्यायचा नसेल तर आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

म्हणून म्हणतो, सावधान ! कोरोनाचे संकट पुन्हा येत आहे !

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT