Goa Beach Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Beach: समुद्रकिनाऱ्यांवर आपण कचरा फेकतो, मातीचे भराव टाकतो आणि सगळी व्यवस्थाच खराब करतो

Beach Sand Ecosystem: समुद्रकिनाऱ्यावरील वाळूमय पर्यावरणाला 'सेंड्यून इकोसिस्टम' या नावाने ओळखले जाते. ही एक अद्वितीय पर्यावरणीय व्यवस्था आहे.

Sameer Panditrao

समुद्रकिनाऱ्यावरील वाळूमय पर्यावरणाला 'सेंड्यून इकोसिस्टम' या नावाने ओळखले जाते. ही एक अद्वितीय पर्यावरणीय व्यवस्था आहे. सामान्यपणे, समुद्रकिनाऱ्यापाशी नैसर्गीकपणे जमा झालेली वाळू असेच वरवरचे चित्र जरी दिसत असले तरी त्या व्यवस्थेमुळे किनाऱ्याच्या अलीकडची सारी जमीन संरक्षित होत असते. समुद्राच्या लाटा जर थेट मातीला (किंवा डोंगराच्या कड्याला देखील) धडका देत असतील तर त्या भागाचा विध्वंस ठरलेला असतो.

समुद्राच्या लाटांच्या धडकेमुळे डोंगरांचे कडे कोसळले आहेत हे गोव्यातील अनेक ठिकाणी आपण अनुभवले आहे. हा विध्वंस समुद्र किनाऱ्यावर जमा झालेली वाळू टाळू शकते. 

वाळू ही वेगवेगळ्या कारणाने कायम हलती राहते. कधी जोरदार वाऱ्यामुळे, कधी लाटांमुळे तिची रचना बदलत असते. या वाळूवर उगवलेल्या वनस्पती या इतरत्र कुठे आपल्याला दिसणार नाहीत. त्यांना इंग्रजीत 'सेंड बाइंडिग प्लांट्स' असे म्हटले जाते, ज्या आपल्या मुळांच्या माध्यमातून वाळूला पकडून ठेवतात.

भरतीच्या रेषेपाशी या वनस्पती उगवतात. या वनस्पतींमुळे भरतीच्या रेषेमागे तयार झालेल्या मातीवर इतर झुडपे तग धरतात आणि त्याच्या अलीकडे मग खाऱ्या  वातावरणात वाढणारी उंच झाडे उदाहरणार्थ नारळी, भेंडी आपल्याला दिसतील. ही एक आगळी क्षेत्रीय रचना असते. अशा रचनेमुळेच भरती एका ठराविक रेषेपर्यंत मर्यादित राहते. समुद्राच्या किनार्‍यावर दुसऱ्या प्रकारची झाडे टिकाव धरून शकत नाहीत.

काही मर्यादित काळापर्यंत कदाचित ती टिकाव धरू शकतील परंतु दीर्घकाळपर्यंत नाही. उदाहरणार्थ, मिरामार येथील किनाऱ्यावर लावलेली सुरूची झाडे समुद्राच्या‌ भरतीच्या पाण्यामुळे कोसळून जात असल्याचे आपण पहातच असतो. 'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती' ही म्हण समुद्राच्या किनारी रेषेबाबत अगदी सत्य आहे. किनाऱ्यावरील वाळू आणि त्यावर नैसर्गिकपणे वाढलेली 'सेंड वाइंडिग प्लांट्स' हीच खरी रक्षणकर्ती असतात हे आपण लक्षात ठेवायला हवे.‌ 

आपण किनारी पर्यावरणात अनेक प्रकारे हस्तक्षेप करतो. कधी तिथं कचरा आणून टाकतो किंवा मातीचे भराव टाकतो. मातीमुळे तिथे उपरी झाडे वाढू शकतात व त्यातून किनाऱ्याचे नैसर्गिक पर्यावरण बिघडू शकते. त्याचा अर्थ एक प्रकारे आपण सबंध किनारी व्यवस्थाच बिघडवून टाकत असतो. समुद्र किनाऱ्यांची रचना बिघडवून टाकणे हे धोकादायक आहे हे लोकांना कळायला हवे.‌

डॉ. आशिष प्रभुगावकर, पर्यावरण अभ्यासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT