Akshaye Khanna FA9LA Dainik Gomantak
मनरिजवण

Video: 36 वर्षांपूर्वी लाहोरमध्ये विनोद खन्नांनी केलेली 'ती' स्टेप; अक्षय खन्नाचा FA9LA डान्स वडिलांची 'Copy'?

Akshaye Khanna FA9LA dance: बॉलिवूडचे दिग्गज कलाकार विनोद खन्ना यांचा एक जुना व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय

Akshata Chhatre

Vinod Khanna old dance video: अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' मधील 'रेहमान डकैत' या भूमिकेमुळे आणि 'FA9LA' या गाण्यातील दमदार नृत्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याने अगदी सहजतेने केलेल्या खतरनाक डान्स मूव्ह्समुळे तो इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलाय. पण अक्षयच्या या वाढत्या लोकप्रियतेदरम्यान, त्याचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज कलाकार विनोद खन्ना यांचा एक जुना व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय ज्यामुळे खन्ना कुटुंबाचा आयकॉनिक वारसा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

१९८९ च्या कार्यक्रमात विनोद खन्ना

हा व्हायरल व्हिडिओ १९८९ मध्ये लाहोर येथे झालेल्या एका चॅरिटी कार्यक्रमातील असल्याचे मानले जात आहे. या व्हिडिओमध्ये, माजी पाकिस्तानी क्रिकेट कर्णधार आणि नंतरचे पंतप्रधान इम्रान खान हे बॉलिवूडच्या दोन महान कलाकारांसोबत, रेखा आणि विनोद खन्ना यांच्यासोबत स्टेज शेअर करताना दिसत आहेत. या फुटेजमध्ये रेखा आणि विनोद खन्ना एकत्र डान्स करतायत.

'FA9LA' डान्सचे रहस्य वडिलांमध्ये

या व्हिडिओतील सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, डान्स करताना विनोद खन्नांच्या हाताच्या आणि दंडाच्या हालचाली. चाहत्यांनी या हालचालींची तुलना लगेचच अक्षय खन्नाच्या व्हायरल 'FA9LA' गाण्यातील एंट्री सिक्वेन्स डान्सशी केली.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी विनोद खन्नांच्या डान्समधील हा 'स्वॅग' अक्षयला अजाणतेपणी वारसा हक्काने मिळाला असल्याची गमतीशीर टिप्पणी केली जातेय. "हे अनुवांशिक आहे. काही गोष्टी पुढच्या पिढीत आपोआप जातात" अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली. एका चाहत्याने तर त्या काळात विनोद खन्ना अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यावरही भारी पडायचे, असे म्हटलेय.

अक्षयचा डान्स होता 'इम्प्रोव्हाईज्ड'

विशेष म्हणजे, अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटातील कोरियोग्राफरने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला होता की, 'FA9LA' गाण्यातील तो संपूर्ण डान्स उत्स्फूर्तपणे केलेला होता. या शॉटमध्ये एकसारखा परफॉर्मन्स देण्यासाठी अक्षय खन्नाला शॉट्सच्या दरम्यान ऑक्सिजन पंप करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात चाललाय? 'Akshaye Khanna'ने शुटींग केलेली एकमेव जागा पाहा; 24 वर्षांनंतरही पर्यटक करतात तुफान गर्दी

Goa Live Updates: झेडपी वेचणूकेत घाटीयांची मतां चलता?

Aropra Nightclub Fire: रोमिओ लेन प्रकरणात 'बेली डान्सर' अडकली! केलं कायद्याचं उल्लंघन; क्रिस्टीनाला 'काम' करण्याची परवानगी नव्हती?

China Fire Tragedy: चीनमध्ये निवासी इमारतीला भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

IND vs SA: 'जस्सी जैसा कोई नहीं!' बुमराहने 'शतक' ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज! VIDEO

SCROLL FOR NEXT