Samay Raina Dainik Gomantak
मनरिजवण

Samay Raina: समय जिवंत आहे! समय रैनाचा कमबॅक, नव्या शोची घोषणा; भारतील स्टँडअप 'शो'साठी बुकिंग सुरु

Samay Raina New Standup Show: समय रैना १५ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर या काळात भारतात बंगळुरु, हैद्राबाद, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि दिल्लीत शो करणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

इंडियाज गॉट लेटेन्ट नावाच्या शोमुळे वादात सापडलेल्या स्टँडअप कॉमेडियन समय रैना कमबॅक करत आहे. समयने नव्या स्टँडअप टूरची घोषणा केली असून, भारतातून याचा शुभारंभ होणार आहे. वादात सापडलेला इंडियाज गॉट लेटेन्ट शो बंद करावा लागल्यानंतर समयने काही काळासाठी भारतात शो न करता परदेशात शो करण्यास पसंती दिली होती.

समय रैनाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन नव्या स्टँडअप टूरची घोषणा केली आहे. समय रैना जिवंत आहे आणि अनफिल्टर्ड असे त्याच्या नव्या टूरचे नाव आहे.

१५ ऑगस्टपासून बंगळुरु येथून स्टँडपअप शोची सुरुवात होणार आहे. बुक माय शोवरुन या शोसाठी बुकिंग सुरु झाली आहे, अशी माहिती समयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.

samay Raina Post

असे असतील शो

बंगळुरु: १५ ते १७ ऑगस्ट

हैद्राबाद: २३  आणि २४ ऑगस्ट

मुंबई: ३० ऑगस्ट

कोलकाता: ०६ – ०७ सप्टेंबर

चेन्नई: १९ -२० सप्टेंबर

पुणे: २६ ते २८ सप्टेंबर

दिल्ली: ०३, ०४ आणि ०५ सप्टेंबर

समय परत येताच चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले आहे. एका तासांत ४० हजार तिकिटांची विक्री झाल्याचे त्यांने म्हटले आहे. आणि हे एक प्रकारचे रेकॉर्ड आहे. या प्रेमासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद, असे त्यांने ठेवलेल्या स्टोरीत नमूद केले आहे.

समयने यापूर्वी युरोप, युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे शो केल्यानंतर भारतात शोची घोषणा केली आहे.

samay Raina Post

समयचा युट्युबवर  सुरु असलेला इंडियाज गॉट लेटेन्ट नावाचा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या शोमध्ये अश्लील शेरेबाजी केल्याचा दावा करत त्याच्या विरोधात गुन्हा देखील नोंद झाला होता. याशिवाय अपूर्वा मुखिजा, आशिष चंचलानी आणि रणवीर अलाहबादीया यांच्याविरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. रणवीरने केलेल्या अश्लील टिपण्णीनंतर प्रामुख्याने शो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT