Samantha marriage Dainik Gomantak
मनरिजवण

Samantha Ruth Prabhu: चर्चांना पूर्णविराम! समंथाने बांधली लग्नगाठ, नवऱ्यासोबतचा पहिला Photo Viral

Samantha Ruth Prabhu Marriage: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता राज निदिमोरू यांनी अखेर अनेक महिन्यांच्या चर्चांना पूर्णविराम देत लग्नगाठ बांधली

Akshata Chhatre

Samantha Ruth Prabhu wedding photos: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता राज निदिमोरू यांनी अखेर अनेक महिन्यांच्या चर्चांना पूर्णविराम देत लग्नगाठ बांधली आहे. आज, सोमवारी (दि.१), या दोघांनी कोईम्बतूरमधील ईशा फाऊंडेशन येथे अत्यंत साध्या आणि भक्तीमय वातावरणात विवाह केला. लग्नानंतर थोड्याच वेळात समंथाने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो पोस्ट करत आपल्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला.

साधेपणाच्या सोहळ्याचे फोटो व्हायरल

रेडिटवर एका युजरने त्यांच्या लग्नाचा खुलासा केल्यावर त्यांच्या टीमने मौन बाळगले होते. मात्र, दुपार होताच समंथाने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले. तिने फोटोंसोबत '०१.१२.२०२५' असे कॅप्शन दिले आहे.

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

समंथाने फोटो पोस्ट करताच अनुपमा परमेश्वरन, निम्रत कौर, डिंपल हयाथी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

राज आणि समंथाचा नात्याचा प्रवास

समंथा आणि राज यांनी त्यांच्या नात्याबद्दल कायम मौन बाळगले असले तरी, २०२४ च्या सुरुवातीपासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. समंथाने २०२१ मध्ये नागा चैतन्यपासून सार्वजनिकरित्या घटस्फोट घेतला होता, तर राजने पहिल्या पत्नीपासून (श्यामाली डे) घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा कधी केली नव्हती, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होता.

लवकरच दोघे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. एकत्र राहण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, मात्र त्यावेळी समंथाच्या टीमने त्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. अखेर आज त्यांनी लग्न करून त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT