काही वर्षांपूर्वी मी कोमात गेलो होतो. मी कोमात असताना मला स्वप्नात नेहमी खोल समुद्र आणि घनदाट जंगल दिसायचे. त्या स्वप्नात अनेक घटना घडायच्या.
त्या स्वप्नांतील घटना माझ्या सतत धन्यात असायच्या, त्यामुळे या घटना सत्यात उतरवत त्याचे चित्रकरण करण्याचे ठरविले आणि त्यातून ‘पेस्कॅडोर’ हा चित्रपट तयार करण्यात आला असल्याचे प्रख्यात अमेरिकन दिग्दर्शक हॅरोल्ड डोमेनिको रॉसी यांनी सांगितले. ते इफ्फीदरम्यान माध्यमांशी बोलत होते. यावेळी निर्माती बारबरा अँनी रासिएल आणि सिनेमॅटोग्राफर आयझॅक जोसेफ बँक्स उपस्थित होते.
रॉसी म्हणाले की, अनेक दिग्दर्शक कधीही होडीवर चित्रपटाचे चित्रकरण करायचे नाही, असा सल्ला देतात त्याची प्रचिती मला या चित्रपटादरम्यान आली. या चित्रपटात जो मच्छीमार दाखविण्यात आला आहे तो कोस्टारिका देशातील समुद्रकिनाऱ्यावरील आहे.
हा चित्रपट प्रामुख्याने कोस्टारिका येथे चित्रित करण्यात आला; कारण स्वप्नात जो अथांग समुद्र येत होता, घनदाट जंगल येत होते त्याला तो अनुरूप ठरला. त्याचप्रमाणे कोस्टारिका या देशात ज्या प्रमाणात अतिक्रमण, परदेशी नागरिकांकडून जमीन खरेदी करून निसर्गाची हानी होत आहे, तो विषयही यात असल्याने तेथे चित्रिकरण करण्यात आले. परंतु सातत्याने होणारे हवामान बदल यामुळे चित्रीकरणात अनेक अडथळे आले.
ज्यावेळी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते, त्यावेळी हॅरोल्ड रॉसी हे त्या चित्रपटांच्या प्रत्येक गोष्टीत मग्न असायचे. चित्रीकरण पूर्ण करून आम्ही घरी परतलो त्यावेळी ते अक्षरश: ढसाढसा रडत होते. कारण, जे त्यांनी स्वप्नात अनुभवले होते, जी दुनिया त्यांनी कोमात असताना पाहिली होती ती त्यांनी सत्यात उतरविली होती. अंधारातून प्रकाशाकडे म्हणतात तसे कोमातून खऱ्या जगात अवतरण्याचा त्यांचा हा प्रवास त्यांनी चित्रपटातून जगासमोर आणला असल्याचे अँनी रासिएल यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.