Bollywood Actor Vikrant Massey | A Still From '12th Fail' Film 
मनरिजवण

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

Vikrant Massey Interview: अभिनेता होण्यापूर्वी विक्रांतला मानसिक आणि आर्थिक स्तरावर खूप त्रास सहन करावा लागला.

Pramod Yadav

Vikrant Massey Goa Experience

मुंबई: पाच हजार रुपये घेऊन मित्रांसोबत गोव्यात आलो. पण, इकडे-तिकडे पैसे खर्च झाले. आणि घरी येताना हॉटेलचे बिल द्यायला खिशात पैसे नव्हते. अखेर मोबईल विकावा लागला, असा अनुभव अभिनेता विक्रांत मॅस्सीने शेअर केला. विक्रांत एका खासगी Youtube Channel ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

विक्रांत मॅस्सी त्याच्या आगामी साबरमती रिपोर्ट या चित्रपटाच्या निमित्ताने विविध ठिकाणी प्रमोशनसाठी हजेरी लावत असतो. नुकतेच त्याने कर्ली टेल्स नावाच्या एका Youtube Channel ला मुलाखत दिली. विक्रांत 12th Fail या सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. अभिनेता होण्यापूर्वी विक्रांतला मानसिक आणि आर्थिक स्तरावर खूप त्रास सहन करावा लागला.

कर्ली टेल्सच्या मुलाखतीत विक्रांतने त्याच्या मित्रांसोबतच्या गोवा ट्रीपमधला किस्सा सांगितला. विक्रांत म्हणाला, "मी नुकतेच कमवायला लागलो होतो. माझ्याजवळ पाच हजार रुपये होते. Volvo Bus ने मित्रांसोबत गोव्याला गेलो. गोव्यात गेल्यानंतर मी खर्च कसा करायचे याचे गणित मांडले. पण, इकडे - तिकडे पैसे खर्च झाले आणि येताना माझ्याजवळ पैसेच उरले नाहीत."

"हॉटेल आणि मुंबई परत यायला तिकिट खरेदी करण्यासाठी देखील पैसे शिल्लक नव्हते. अखेर मला मोबाईल विकावा लागला आणि त्यानंतर हॉटेल बिल भागवून आणि उरलेल्या पैशातून मी मुंबईचे तिकिट खरेदी केले", असे विक्रांतने मुलाखतीत सांगितले.

दरम्यान, विक्रांतला स्टारडम मिळण्यापूर्वी तसेच अभिनयातून उत्तम कमाई होण्यापूर्वी आर्थिक स्थैर्य नव्हते. पैसा कमविण्यासाठी त्याला फार कष्ट आणि मेहनत करावी लागली, याचा त्यांने विविध मुलाखतीतून वारंवार उल्लेख केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT