Mhozo Ixtt Francis Drama  Dainik Gomantak
मनरिजवण

Saint Francis Xavier Feast: फेस्तादिसां नाटक!! मडगावात 'म्हजो इष्ट फ्रान्सिस' च्या माध्यमातून उलघडणार सेंट झेवियरांच्या गोष्टी

Old Goa December Feast: फेस्ताच्या निमित्ताने आगीमा फर्नांडिस ही आपल्या सह-कलाकारांसह सेंट झेवियर यांचा जीवनप्रवास एका नाटकाच्या माध्यमातून उलघडून दाखवणार आहे

Akshata Chhatre

Mhozo Ixtt Francis Drama at Madgaon Goa

मडगाव: सेंट फ्रान्सिस झेवियर किंवा गोंयेचो सायब यांचे फेस्त ३ डिसेंबर रोजी साजरे केले जाईल. सध्या गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन सुरु आहे आणि याचवेळी होणारे सायबाचे फेस्त म्हणजे एक दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल.आता सायबाच्या फेस्ताच्या निमित्ताने आगीमा फर्नांडिस ही आपल्या सह-कलाकारांसह सेंट झेवियर यांचा जीवनप्रवास एका नाटकाच्या माध्यमातून उलघडून दाखवणार आहे.

'म्हजो इष्ट फ्रान्सिस' या नाटकाचे सादरीकरण ३ डिसेंबर रोजी रवींद्र भवन मडगाव येथे संध्याकाळी ७:३० वाजता केले जाईल. या नाटकाच्या माध्यमातून सेंट झेवियर यांचे विचार, त्यांचे चमत्कार आणि त्यांची शिकवण प्रेक्षकांसमोर मंडळी जाणार आहे. या नाटकाचे संपूर्ण लिखाण आणि दिग्दर्शन स्वतः आगीमा फर्नांडिस हिने केले आहे.

नाटकाची कल्पना नेमकी सुचली तरी कशी यावर बोलताना आगीमा फर्नांडिस म्हणते की तिला एक नवीन नाटक बसवायचं होतं आणि तिच्याच एका मित्राने शवप्रदर्शनच्या निमित्ताने सेंट झेवियर यांच्यावर एखादं नाटक बसवण्याची कल्पना तिला सुचवली. हा विचार तिला भावल्याचं आगीमा सांगते, तिच्या दिवंगत भावाचं नाव सुद्धा सेंट झेवियर यांच्याशी जुळणारं होतं म्हणून पटकन तिने नाटक बसवण्याचा निर्णय घेतला.

या नाटकाच्या माध्यमातून एका लहान मुलाचं आणि सेंट झेवियर यांच्या नात्याचं उदाहरण दिलं जाणार आहे. गोष्ट याच दोन पात्रांच्या भोवती फिरताना दिसेल, या दोघां व्यतिरिक नाटकात नऊ आणखीन पात्रं असल्याची माहिती देखील आगीमा फर्नांडिसने गोमंतक टाइम्स या वृत्तपत्राला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT