Zakir Hussain at Serendipity 2023 Serendipity Instagram
मनरिजवण

Ustad Zakir Hussain: उस्तादजींची सेरेंडिपीटीतली 'ती' मैफिल ठरली पहिली आणि शेवटची...

Serendipity Art Festival Goa: गेल्यावर्षी उस्ताद झाकीर हुसेन यांना समोरासमोर अनुभचवण्याची आणि त्यांच्या तबल्याची धून आयुष्यभर जोपासण्याची संधी गोव्याला मिळाली

Akshata Chhatre

Zakir Hussain Performance at Serendipity 2023

पणजी: गोवा म्हणजे कलाकारांची खाण आहे असं म्हटलं जातं. एकाहूनेक कलाकार गोव्याच्या भूमीत जन्माले आहेत आणि याच कलेचा सन्मान करण्यासाठी दरवषी गोव्यात सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं.

हस्तकला, चित्रकला, संगीत तसेच इतर विविध क्षेत्रांमधून अनेकविध कलाकार गोव्यात येतात आणि गेल्यावर्षी उस्ताद झाकीर हुसेन यांना समोरासमोर अनुभचवण्याची आणि त्यांच्या तबल्याची धून आयुष्यभर जोपासण्याची संधी गोव्याला मिळाली. आता जरी झाकीर हुसेन आपल्यात नसले तरीही त्यांच्या याच आठवणी प्रत्येक रसिकाच्या मनात कायम राहणार आहेत.

गेल्यावर्षी गोव्यात तबल्याचा कार्यक्रम सादर कारण्यासाठी आलेल्या झाकीर हुसेन यांनी झी झेस्टला एक मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीत त्यांनी गोव्यातील सेरेंडिपिटी कार्यक्रमातील हा त्यांचा पहिलावहिला अनुभव असल्याचं सांगितलं होतं.

केवळ भारतातच नाही तर जगभरात पॉप संगीताच्या तुलनेत भारतीय शास्त्रीय संगीत जास्ती प्रचलित आहे किंवा शास्त्रीय संगीताचे अधिकाधिक कार्यक्रम होतात असं उस्तादजी म्हणाले होते. गेल्यावर्षी झाकीर हुसेन यांनी स्वतः ९२ शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले होते.

तरुण पिढी शास्त्रीय संगीतात दाखवत असलेल्या रुचीचा त्यांना अभिमान वाटायचा. नवोदित संगीतकार, गायक यांची कला पाहून मी देखील भयभीत होतो अशी ते म्हणाले होते. मी काही सर्वात उत्तम नाही, ईशान किशन किंवा यशवंत वैष्णव यांना ऐकताना मी मंत्रमुग्ध होतो असं म्हणत त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता.

तरुण तबला वादक ज्याप्रमाणे ताल धरतात ते मला देखील जमणारं नाही असं म्हणत त्यांनी नवीन कलाकारांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. आता जेव्हा गोव्यात पून्हा सेरेंडिपिटीचा महोत्सव सुरु आहे, तेव्हा गेल्यावर्षीच्या उस्तादजींच्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT