Mahaavatar Narasimha Dainik Gomantak
मनरिजवण

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

Mahavatar Narasimha box office collection: अॅनिमेशनपट असूनही सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात घर करणारा 'महावतार नरसिंह' हा पौराणिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवत आहे.

Sameer Panditrao

मुंबई: अॅनिमेशनपट असूनही सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात घर करणारा 'महावतार नरसिंह' हा पौराणिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवत आहे. अश्विन कुमार दिग्दर्शित या अॅनिमेटेड फीचरने सगळीकडे लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट साकनिल्क यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, 'महावतार नरसिंह' चित्रपटाने शनिवारी (९व्या दिवशी) तब्बल ₹१५ कोटींची नेट कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाची एकूण कमाई ₹६७.९५ कोटींवर पोहोचली आहे. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने ₹४४.७५ कोटींचे दमदार यश मिळवले होते, तर दुसऱ्या शुक्रवारीच ₹७.७ कोटींची कमाई झाली होती.

उस्फूर्त प्रतिक्रिया

शनिवारी तेलुगू भाषिक भागांमध्ये 'महावतार नरसिंह'साठी ७४.०८% ची एकूण थिएटर ओक्युपन्सी नोंदली गेली. सकाळच्या शोला ४६.३६% प्रतिसाद मिळाला, जो दुपारी ७४.६०% पर्यंत वाढला. संध्याकाळी ८१.७७% आणि रात्री ९३.५७% इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.

हिंदी आणि तमिळ प्रेक्षकही खूप उत्साही

हिंदी आवृत्तीला विशेषतः महानगरांमध्ये आणि उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदी भाषेत एकूण ५७.१७% थिएटर ओक्युपन्सी नोंदली गेली असून, रात्रीच्या शोमध्ये ती तब्बल ८२.४७% पर्यंत पोहोचली.
तमिळ भाषिक प्रेक्षकांमध्येही हा चित्रपट लोकप्रिय ठरतोय. तामिळनाडूमध्ये एकूण ६६.६६% ओक्युपन्सी शनिवारी नोंदली गेली.

गुणवत्तापूर्ण अॅनिमेशन, अध्यात्मिक विषय आणि प्रभावी मांडणी यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध

जयपूर्णा दास आणि रूद्र प्रताप घोष यांनी लिहिलेली पटकथा, उत्कट अध्यात्मिक विषयवस्तू आणि सजीव अॅनिमेशनमुळे ‘महावतार नरसिंह’ ला सोशल मीडियावर भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. भारतीय अॅनिमेशन चित्रपटसृष्टीतील हा एक मैलाचा दगड ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT