Bollywood actor Dharmendra dies Dainik Gomantak
मनरिजवण

Dharmendra Passes Away: सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन

Dharmendra Death News: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे.

Akshata Chhatre

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे आज (सोमवार, २४ नोव्हेंबर) वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. 'IANS' या वृत्तसंस्थेनं पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिलीय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीवर आणि कोट्यवधी चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रकृती बिघडल्यानंतर उपचार सुरू

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात अनेक दिवस उपचार सुरू होते आणि त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

तरीही, त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी आणून उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. घरी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

अफवांवर कुटुंबियांनी केले होते खंडन

गेल्या काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर फिरत होत्या. एवढेच नव्हे तर, त्यांचे निधन झाल्याच्या अफवा देखील मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी या बातम्यांचे खंडन करत त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय! मडगाव रवींद्र भवनचा होणार कायापालट; व्हॅट कायद्यात सुधारणा अन् 'जीआयएम'ला विद्यापीठाचा दर्जा

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Savoi Verem: झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर; मांडवीच्या कडेवर वसलेला गाव 'सावईवेरे'

Goa History: ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा'! डॉ. गायतोंड्यांना अटक केली, 17 फेब्रुवारी 1955ला अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले..

SCROLL FOR NEXT