amitabh bachchan viral video latest kbc: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून होस्ट करत असलेला लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC) सध्या चर्चेत आहे. या शोच्या 'केबीसी ज्युनियर' (KBC Junior) च्या १७ व्या पर्वातील एका व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर पालकांच्या मार्गदर्शनावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, गुजरातचा १० वर्षांचा स्पर्धक इशित भट्ट याचा शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोरचा अति-आत्मविश्वास प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाही. पाचवीत शिकणाऱ्या या मुलाने बिग बींना 'मला नियम सांगू नका, ते मला माहीत आहेत,' असे बोलून थेट सुनावले. इतकेच नाही तर, पर्याय येण्यापूर्वीच त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे देत 'अरे, उत्तर लॉक करा' असे उद्गार काढले.
इशित भट्टने सुरुवातीच्या ४ प्रश्नांपर्यंत आपला अति-आत्मविश्वास कायम ठेवला, पण ५ व्या प्रश्नावर (२५,००० रुपयांसाठी) तो चुकला आणि त्याला काहीही न जिंकता शोमधून बाहेर पडावे लागले. हा प्रश्न रामायणाशी संबंधित होता. इशितने चुकीचे उत्तर दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मिश्किलपणे टोमणा मारला की, "तुम्हीच एकटे आहात जे हुशार नाहीत." चुकीच्या उत्तरानंतर मुलाचा चेहरा उतरला होता आणि त्याचे पालकही निराश दिसले.
हा व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर (X) पालकांच्या मार्गदर्शनाबद्दल मोठी चर्चा रंगली. अनेक युजर्सनी मुलाच्या अति-आत्मविश्वासासाठी थेट त्याच्या पालकांना जबाबदार धरले आहे
एका युजरने लिहिले की, "खूप समाधानकारक शेवट! हे मुलासाठी नाही, तर पालकांसाठी बोलत आहे. जर तुम्ही मुलांना नम्रता, संयम आणि शिष्टाचार शिकवले नाही, तर ते असे उद्धट आणि अति-आत्मविश्वासी बनतात. एक रुपयाही न जिंकल्याने त्यांना खूप दिवस टोचत राहील." दुसऱ्या युजरने लिहिले, "उत्तम शेवट. अहंकार नाडला. आता पालकांना कदाचित शिकायला मिळेल की, 'बॅड मॅनर्स' शिकवणे म्हणजे पालकत्व नाही."
या संपूर्ण एपिसोडमध्ये मुलाच्या गैरवर्तनानंतरही अमिताभ बच्चन यांनी संयम राखला आणि आपल्या परिपक्वतेने परिस्थिती हाताळली. एका बाजूला युजर्स मुलाच्या वागण्यावर नाराज असताना, त्यांनी बिग बींच्या शालीनतेचे आणि संयमाचे जोरदार कौतुक केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.