Jamie lever Viral Video Dainik Gomantak
मनरिजवण

Viral Video: ये तो हमारे गोवा मे भी है! बालीत आहे तरी काय? अभिनेत्री जॅमी लिव्हरची रिल होतेय व्हायरल

Jamie lever Viral Video: जॅमीचा पणजीतील कला अकादमीत एक कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने तिने एक खास रिल केलीय.

Pramod Yadav

बॉलिवूड अभिनेत्री आणि कॉमेडियन जॅमी लिव्हरचा सध्या बाली येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. समुद्रकिनारा, फ्ली मार्केट, डॉल्फीन, नारळपाणी हे सगळं तर गोव्यात देखील आहे. मग, बालीत असं काय आहे? असा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जॅमी लिव्हर प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची लेक आहे. अल्पावधीतच तिने देखील कला क्षेत्रात मोठे नाव मिळवले आहे. जॅमीचा पणजीतील कला अकादमीत एक कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने तिने एक खास रिल केलीय. यारिलमध्ये तिने बाली आणि गोव्याची नाट्यमय पद्धतीने तुलना केलीय. जॅमीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

हे असे समुद्रकिनारे तर गोव्यात देखील आहेत, अशा शॅक्स गोव्यातही आहेत. गोरे परदेशी, डॉल्फीन, फ्ली मार्केट, नारळपाणी हे सगळं गोव्यात पण आहे. दहा तासांची फ्लाईट घेऊन हे मला बालीचे फ्ली मार्केट दाखवत आहेत, असे जॅमी या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. खरतर जॅमीने तिच्या गोव्यात होणाऱ्या आगामी एका शोच्या निमित्ताने ही रिल तयार केली आहे.

द जॅमी लिव्हर शो

जॅमी लिव्हरचा शो येत्या व्हॅलेंटाईनला (१४ फेब्रुवारी) पणजी येथील कला अकादमीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जॅमीने हा व्हिडिओ तयार केला आहे. यात ती बाली आणि गोव्याची तुलना करताना दिसत असून, बालीत असणाऱ्या गोष्टीत गोव्यात देखील असल्याचे सांगत आहे.

गेल्या काही काळापासून गोव्याच्या पर्यटनाबाबत नकारात्मक प्रचार सुरु आहे. गोव्यापेक्षा लोक बाली, थायलंड, दुबईला पसंती देत असल्याचा दावा अनेकांनी केला. दरम्यान, जॅमीने कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण, बाली असणाऱ्या गोष्टी गोव्यात देखील उत्तम पद्धतीने उपलब्ध असल्याचा व्हिडिओ केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT