Devara Part 1 
मनरिजवण

Devara Part 1: गोव्यातील वॉटर ॲक्शन सीन, गाणी आणि बरचं काही... NTR ने चित्रपटाबाबत केले अनेक खुलासे

N. T. Rama Rao Jr: सैफ अली खान यांनी देखील काही उत्तम ॲक्शन सीक्वेन्समध्ये भाग घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

Pramod Yadav

मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार मॅन ऑफ मासेस एनटीआर ज्युनियर पॉवर-पॅक परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. एनटीआरच्या नव्या कोऱ्या 'देवरा: भाग 1' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमाची अनेक गाणी आणि ॲक्शन सीन गोव्यात चित्रित करण्यात आले आहेत.

सिनेमातील हाय-इंटेन्सिटी वॉटर सीनचे चित्रिकरण नुकतेच पार पडले. एनटीआरने देवरा सिनेमातील गाणी आणि ॲक्शन सीनबाबत एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.

Devara: Part 1 सिनेमा शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर आव्हानात्मक होता, असे एनटीआर ज्युनियरने म्हटले. चित्रपटात ॲक्शन आणि ड्रामा दोन्ही आहेत, त्यामुळे मी देवराला 'ऍक्शन-ड्रामा' म्हणेन, असेही त्याने नमूद केले.

संदीप रेड्डी वंगा नुकतेच गोव्यात असताना त्यांनी सिनेमावर भाष्य केले. चित्रपटात ॲक्शन आणि ड्रामा या दोन्ही गोष्टींवर भर देण्यात आल्याचे संदीप म्हणाले. सैफ अली खान यांनी देखील काही उत्तम ॲक्शन सीक्वेन्समध्ये भाग घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्स भव्य दिव्य करण्यासाठी मोठी मेहनत घेण्यात आली आहे. ॲक्शन चित्रपटाचे मुख्य आकर्षण असल्याने त्यावर जास्त भर देण्यात आला आहे. पीटर माइल्स, सॉलोमन आणि केनी बेट्स यांनी यासाठी मेहनत घेतल्याचे एनटीआर ज्युनियरने सांगितले.

चित्रपटाचे दिग्दर्शक कोरटाला सिवा यांनी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि देवराच्या भूमिकेत असणारा एनटीआर ज्युनियर अशा तगड्या स्टारकास्टमुळे सर्वांनाच मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पाहण्याची आतुरता आहे. कोरटाला सिवा दिग्दर्शित, देवरा: भाग 1 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT