गोव्यात काँग्रेस-शिवसेना एकत्र लढणार? Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात काँग्रेस-शिवसेना एकत्र लढणार?

दिल्लीत प्रियांका आणि राहूल गांधींना भेटल्यानंतर गोव्यामध्ये शिवसेना-कॉंग्रेस एकत्र लढण्याचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले.

दैनिक गोमन्तक

पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, गोव्यासह (Goa) 5 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेची (Shivsena) युती आता महाराष्ट्राबाहेर (Maharashtra) इतर राज्यातही पाहायला मिळणार. राजधानी दिल्लीत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संकेत दिले की शिवसेना पक्ष उत्तर प्रदेश आणि गोव्यातही काँग्रेससोबत युती करू शकतो. दोन्ही पक्ष एकत्र आगामी विधानसभा निवडणूक (Goa Assembly election) लढवू शकतात. पुढील वर्षी या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र काम करण्याचा विचार करत असल्याचे राऊत यांनी सांगितले. काल सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी प्रियंका गांधी यांच्यासोबत सुमारे तासभर राऊत यांची भेट घेतली. गोव्यातह विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly elections) धामधूम पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच गोव्यात कॉंग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) युती करत सत्तेत असणाऱ्या भाजपला धक्का दिला होता. यातच आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा (Priyanka Gandhi) उद्या गोव्यात येणार आहेत.

या बैठकीनंतर खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. ही बैठक सकारात्मक होती. आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. देशाच्या राजकारणासोबतच उत्तर प्रदेश आणि गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली तेव्हा शक्य झाल्यास आणि परिस्थीतीचाआढावा घेवून उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणुका लढवतील. आम्हाला काँग्रेससोबत काम करायचे आहे आणि त्याचा परीणाम काय होते ते बघायचे आहे."

काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी होऊ शकत नाही.

याआधी मंगळवारी शिवसेना खासदार राऊत यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, "काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी होऊ शकत नाही आणि विरोधकांच्या चर्चा होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

ममता बॅनर्जी सातत्याने काँग्रेसवर प्रश्न उपस्थित करत आहेत

सध्या ममता बॅनर्जी सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत, मात्र त्या काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यामुळेच ममता बॅनर्जी काँग्रेसशिवाय नवी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा वारंवार रंगत आहेत. नुकतीच ममता बॅनर्जी यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. आणि आता पुन्हा 13-14 डिसेंबरला गोवा दौऱ्यावर येणार आहे. ममता बॅनर्जी यांनी मुंबईतच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT