Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

उत्पल पर्रीकरांनी गोवेकरांना घातली भावनिक साद

जेव्हा माझे (Utpal Parrikar) वडील गोव्याच्या सक्रीय राजकारणात होते, तेव्हा त्यांनी गोव्यातील जनतेसाठी कार्य केले.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. (Utpal Parrikar made an emotional appeal to the people of Goa)

उत्पल पर्रीकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, ''मी पणजीणमधून अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मला अनेक राजकीय पक्षांनी ऑफर दिली आहे. मी त्यांचं धन्यवाद मानतो. पणजीमधील तमाम मतदारांसाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच त्यांनी पुढे म्हटले, ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केले त्यांच्यासाठी मी आगामी विधानसभा निवडणूक लढवत आहे. माझ्यावर अन्याय झाला म्हणून काय झालं मला त्याचं काहीचं वाटत नाही. जेव्हा माझे वडिल गोव्याच्या सक्रीय राजकारणात होते तेव्हा त्यांनी गोव्यातील जनतेसाठी कार्य केले.''

यादरम्यान त्यांना अनेक पक्षांकडून पाठिंबा देण्याचे प्रस्ताव मिळाले होते. पण या सर्व ऑफर्सना झुगारून त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पणजीतून अपक्ष पद्धतीने निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामागचे कारण विचारले असता ते म्हणाले, 'ज्या पक्षात माझ्या वडिलांनी कार्य केले आहे, त्याच पक्षातून विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) लढवण्याची माझी इच्छा होती. पण पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. परंतु तरीदेखील गोव्यातील जनतेसाठी मला काम करायचे आहे. कारण मला गोव्यातील सर्वसामान्य जनतेची चिंता आहे. म्हणून मी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचे ठरवले आहे. माझा हा निर्णय गोवेकरांसाठी आणि त्यांच्याच बाजूने असणार आहे. त्यामुळे आता सर्व काही जनतेच्याच हातात आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT