Utpal Parrikar has no candidature from Panaji constituency Dainik Gomantak
गोवा निवडणूक

उत्पल पर्रीकरांना डावलत बाबूश मोन्सेरात यांना पणजीमधून उमेदवारी जाहीर

उत्पल पर्रीकर यांना पणजीतून उमेदवारी जाहीर झाली नसली तरी डिचोलीमधून तिकिट देण्याची तयारी पक्षाने दाखवली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Election 2022) भाजपकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपमध्ये काही जागांचा तिढा न सुटल्याने भाजपची यादी येण्यास वेळ लागला. आणि अखेर आज भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी पणजीतून प्रसिद्ध केली आहे. मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रीकरांना डावलत बाबूश मोन्सेरात यांना पणजी (Panaji) मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली. असे असले तरी उत्पल पर्रीकरांना (Utpal Parrikar) डिचोलीमधून (Bicholim) तिकिट देण्याची तयारी पक्षाने दाखवली आहे. विद्यमान आमदार आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणेकरांची ही सीट आहे. पाटणेकर निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं जात आहे. (BJP Denied Ticket to Utpal Parrikar)

भाजपची (BJP) उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेत्यांनी उचलून धरलेल्या उत्पल पर्रिकरांच्या मुद्यावरून कडाडून टीका केली. तृणमूल काँग्रेसवरही फडणवीसांनी थेट निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राउत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे. त्यांचा महाविकास आघाडीचा 'फॉर्म्युला' गोव्यात फसला असला तरी राऊत गोव्यात तळ ठोकून आहेत. आणि भाजपने उमेदवारी नाकारल्यावर राऊत यांनी 'मोठ्या मनाने' उत्पल पर्रिकर यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते. मात्र शिवसेनेला पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणून उत्पल पर्रिकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही असे वक्तव्य राउतांनी आज गोव्यातून केले.

अखेर भाजपची डोकोदुखी असलेल्या पणजी मतदारसंघाचा न्यायनिवाडा झाला आणि आज स्व. मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रीकरांना डावलत बाबूश मोन्सेरात यांना पणजी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली. असे करत असताना, "विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना पणजीमधून तिकीट देण्यात आले आहे. उत्पल पर्रीकर आणि त्यांचे कुटुंब आमचे कुटुंब आहे. आम्ही उत्पलला आणखी 2 पर्याय दिले पण त्याने पहिला पर्याय नाकारला. 2रा पर्यायावर तो विचार करत आहे त्यामुळे आम्हाला आशा आहे की पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे उत्पल समर्थन करेल," असे भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस भाजपची उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपची उमेदवारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे

  1. साखळी - प्रमोद सावंत

  2. मांद्रे - दयानंद सोपटे

  3. पेडणे - प्रवीण आर्लेकर

  4. थिवी - नीलकंठ हळर्णकर

  5. म्हापसा - ज्योशुआ डिसोझा

  6. शिवोली - दयानंद मांद्रेकर

  7. साळगाव - जयेश साळगावकर

  8. पर्वरी - रोहन खंवटे

  9. हळदोणा - ग्लेन टिकलो

  10. पणजी - बाबूश मोन्सेरात

  11. ताळगाव जेनिफर मोन्सेरात

  12. सांत आंद्रे - फ्रान्सिस्को सिल्व्हेरा

  13. मये - प्रेमेंद्र शेट

  14. पर्ये - दिव्या विश्वजीत राणे

  15. वाळपई - विश्वजीत प्रतापसिंग राणे

  16. प्रियोळ - गोविंद गावडे

  17. फोंडा - रवी नाईक

  18. मडकई - सुभाष भिंगी

  19. शिरोडा - सुभाष शिरोडकर

  20. मुरगाव - मिलिंद नाईक

  21. वास्को - कृष्णा साळकर

  22. दाबोळी - मॉविन गुदिन्हो

  23. नुवे - दत्ता विष्णू बोरकर

  24. फातोर्डा - दामोदर नाईक

  25. मडगाव - मनोहर उर्फ बाबू आजगावकर

  26. बेणावली - दामोदर बांदोडकर

  27. नावेली - उल्हास तुवेकर

  28. कुंकळ्ळी - क्लाफासियो डायस

  29. वेली - साविओ रॉड्रिग्ज

  30. केपे - चंद्रकांत कवळेकर

  31. कुडचडे - निलेश काब्राल

  32. सावर्डे - गणेश गावकर

  33. सांगे - सुभाष फळदेसाई

  34. काणकोण - रमेश तवडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT