Nitin Gadkari and J P Nadda  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आज गोवा दौऱ्यावर

नितीन गडकरी 11:55 पर्यंत पणजीत पोहोचतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आज गोवा दौऱ्यावर येणार आहेत. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते भाजपच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन होणार आहे. गडकरी काही निवडक मतदार संघांचा दौरा देखील करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. सकाळी 11 वाजता त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होईल. 11:55 पर्यंत ते पणजीत पोहोचतील. दुपारी 12:30 वाजता भाजपाच्या जाहिरनाम्याचे त्यांच्या हस्ते प्रकाशन होईल. (Goa Assembly Election 2022)

राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा दक्षिण गोव्यातील फातोर्डा व नावेली येथे जाहीर सभांना संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 फेब्रुवारी रोजी गोव्यात येत आहेत. गुरुवारी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील जागेत ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान 11 तारखेला गोव्यात येणार असे कळविण्यात आले होते. मात्र, मोदी यांचा दौरा 10 रोजी ठरला आहे. या बदललेल्या तारखेची नोंद गोमंतकीयांनी घ्यावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.

गोवा विधानसभेसाठी (Goa Assembly Election) आतापर्यंत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाणार होता मात्र ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर गोव्यातील सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे भाजपचा (Goa BJP) जाहीरनामाही प्रसिद्ध होण्यास उशीर झाला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर आता भाजपच्या जाहीरनाम्यातून गोव्यातील जनतेसाठी कोणती आश्वासनं दिली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT