Mahua Moitra Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'जेपी नड्डा गोव्यातील जनतेला मूर्ख बनवत आहेत'; मोईत्रा यांचा हल्लाबोल

गोव्यातील (Goa) लोकांना बदल हवा आहे आणि तो आता घडत आहे. त्यामुळे नड्डाजी, तुम्ही काहीही म्हणा, आम्ही (TMC) इथेच राहायला आहोत," असेही महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

दोन दिवसीय गोवा (Goa) दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) गोव्यातील जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

मोईत्रा यांनी टीएमसी शासित पश्चिम बंगालमधील गुन्ह्याबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांवर नड्डा यांच्यावर जोरदार प्रहार केला. नड्डा गोव्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत काय करीत आहेत. याबद्दल ते बोलत, राज्यातील लोकांना पटवून देण्यात त्यांनी आपला वेळ वाया घालविला आहेत. भाजपने गोव्याला फसवले आहे, असे मोईत्रा यांनी सांगितले.

गोव्यातील लोकांना बदल हवा आहे आणि तो आता घडत आहे. त्यामुळे नड्डाजी, तुम्ही काहीही म्हणा, आम्ही (TMC) इथेच राहायला आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या पराभवानंतर नड्डा यांनी "काही महिने घरी बसूले पाहिजे होते. भाजपला 2017 मध्ये गोव्यात सरकार स्थापन करण्याचा जनादेश नव्हता कारण त्यांना 13 जागाच मिळाल्या होत्या, भाजपने इतर पक्षांच्या आमदारांना फोडत आणि इतर पक्षांशी युती करत गोव्यात सत्ता मिळविली.

भाजप गोव्यात राज्य करण्यात अपयशी ठरले आहे. आज 6,000 लोक हेरिटेज साईटवर (जुन्या गोव्यात) ASI (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) च्या जागेत बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केल्याचा निषेध करत आहेत. किशोरवयीन मुलगी सिद्धी नाईकच्या हत्येचे प्रकरण देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले. ज्याची अद्याप उकल झालेली नाही. "गोव्यात लोकांना सुरक्षित वाटत नाही, बलात्कार, खून आणि महिलांवरील गुन्ह्यात वाढ झाली आहे.

दरम्यान, उत्तर गोव्यातील वाल्पोई विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात बोलताना नड्डा यांनी राज्यातील जनतेला टीएमसी तसेच आपपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. "जर आपण महिलांवरील गुन्ह्यात गोवा क्रमांक एकचे राज्य बनले आहे. बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि एकूणच गुन्हेगारीचे प्रमाण पाहिल्यास, या सर्व गोष्टी पश्चिम बंगालमध्ये देखील आहेत, असे भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT