Trinamool Congress appointed party lawmaker Mahua Moitra as official state in charge of Goa  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

महुआ मोईत्रा तृणमूलच्या गोवा प्रभारी

गोव्यात येत्या 3 महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.

दैनिक गोमन्तक

तृणमूल काँग्रेसने (TMC) राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आपली पोहोच वाढवण्याचा प्रयत्न करत शनिवारी लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा यांची पक्षाच्या गोवा युनिटच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. गोव्यात येत्या 3 महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. "आमच्या माननीय सभापती ममता बॅनर्जी यांना महुआ मोईत्रा यांना AITC च्या गोवा युनिटच्या प्रभारी म्हणून नियुक्त करताना आनंद होतो आहे," असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे.

यापुर्वी, तृणमूल काँग्रेसने शनिवारी पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उपाध्यक्ष लुइझिन फालेरो यांना उमेदवार म्हणून घोषित केले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री फालेरो यांनी काँग्रेस सोडून सप्टेंबरमध्ये तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. गेल्या महिन्यात त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. आणि आता राज्यमभेची उमेदवारी देण्यात आली आहे. गोव्यात आपल्या तृणमून पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात किनारी राज्याचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी गोवेकरांना अनेक अश्वासन दिली आणि स्थानिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी गाठीही घेतल्या.

दरम्यान गोव्यात निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. प्रचारासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. 2022 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहायला लागले. आणि सध्या टेनिस स्टार आणि तृणमूल काँग्रेसचे नेते लिएंडर पेस गोवा दौऱ्यावर आहे. ते कधी मच्छा मार्केटमधील लोकांशीसंवाद साधतांनी दिसतात तर कधी एका बेकरच्या टॅटूने प्रभावित होतांना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT