पार्सेकर-सोपटे Dainik Gomantak
गोवा निवडणूक

दोन राजकीय मित्र तिसऱ्यांदा आमनेसामने

पार्सेकर-सोपटे लढत रंगणार ः युवा उमेदवारांचे आव्हान

दैनिक गोमन्तक

मोरजी: संपूर्ण राज्याचे दर निवडणुकीत मांद्रे मतदारसंघावर लक्ष असते,कारण या मतदारसंघाने दोनवेळा राज्याला मुख्यमंत्री दिले. या मतदारसंघातून निवडून आलेला आमदार झाल्यावर मंत्री होतोच, आणि मंत्री झाल्यावर पुन्हा निवडून येण्याऐवजी त्यांचा पराभव होतो. हा इतिहास बदलण्यासाठी आता भाजपचे खंदे समर्थक आणि ३२ वर्षानंतर भाजप सोडलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष म्हणून या निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत. एकेकाळचे मित्र असलेले आमदार दयानंद सोपटे आणि पार्सेकर हे तिसऱ्यांदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

माजी मुख्यमंत्री पार्सेकर आणि आमदार सोपटे हे यापूर्वी २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत आमने सामने आले होते, प्रत्येकी दोघांनीही एकमेकांना पराभूत केले. आता तिसऱ्यांदा एकमेकांच्या विरोधात उभे असून दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ तर होणार नाही ना, अशी शंका आता वर्तवली जात आहे. एकेकाळचे पार्सेकर यांचे समर्थक असलेले दीपक कळंगुटकर हेही गोवा फॉरवर्ड तर्फे रिंगणात असल्याने तेही पार्सेकर आणि सोपटे यांच्या मतांची विभागणी करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूने कॉंग्रेसला ही जागा न मिळाल्याने रमाकांत खलप, माजी मंत्री संगीता परब, युवा नेते सचिन परब नाराज बनले आहेत, ते युतीच्या उमेदवारासाठी काम करतील, की पार्सेकर यांना मदत करतील यावर सर्व गणिते अवलंबून असणार आहेत. ऐनवेळी दीपक कळंगुटकर यांचे समर्थक पार्सेकर यांच्या बाजूने तर जाणार नाहीत ना, अशीही चर्चा विश्‍लेषकांत होत आहे.

भाजपतर्फे आमदार दयानंद सोपटे, मगो तर्फे जीत आरोलकर, अपक्ष म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा फॉरवर्ड तर्फे दीपक कळंगुटकर, आम आदमी तर्फे ॲड. प्रसाद शहापूरकर व आरजी तर्फे सुनयना गावडे रिंगणात आहेत. या मतदारसंघात मगो आणि भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ आम आदमी, गोवा फॉरवर्ड आणि आरजीचे कार्यकर्तेही प्रचारार्थ घरोघरी जाताना दिसत आहेत.

रोजगार दिल्याने युवकांच्या अपेक्षांत वाढ

मांद्रे मतदारसंघात सध्या आमदार दयानंद सोपटे यांनी आपली ताकत वाढवली आहे, पक्ष कार्यकर्त्यांसह समर्थकांना सोबत घेऊन ते कार्यरत आहेत. सरकारमध्ये मंत्री नसतानाही, साडे तीनशेपेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या मतदारसंघातील युवकांना देण्यात ते यशस्वी ठरले आहेत,त्यामुळे युवकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.भविष्यातही रोजगार ते उपलब्ध करतील,या अपेक्षेने युवाशक्ती त्यांच्या पाठिशी राहिल,अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

बहुरंगी लढत अपेक्षित

या मतदार संघात सुरुवातीला मगो विरुद्ध भाजप अशी सरळ लढत दिसत होती, परंतू आता माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष म्हणून रिंगणात असल्याने आमदार दयानंद सोपटे, जीत आरोलकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, दीपक कळंगुटकर , प्रसाद शहापूरकर, जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर अपक्ष आणि सुनयना गावडे यांच्यात लढत अपेक्षित असल्याने ती बहुरंगी लढत होणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT