Goa MGP  Dainik gomantak
गोवा निवडणूक

त्रिशंकू राजकीय परिस्थितीत मगोची बोली वाढली...

काँग्रेस आणि भाजपा (Goa BJP) या दोघांनाही बाजूला ठेवून आम्ही सरकार करू; सुदिन ढवळीकर

दैनिक गोमन्तक

मडगाव: तापलेल्या राजकीय तव्यावर आपली पोळी चांगल्या प्रकारे भाजून घेण्याची कला अवगत असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता गृहीत धरून राजकीय बाजारात आपली बोली वाढविण्याचे धोरण अवलंबिले आहे.

(Statment of sudin Dhawalikar on goa election 2022)

काँग्रेस आणि भाजपा (Goa BJP) या दोघांनाही बाजूला ठेवून आम्ही सरकार करू असे वक्तव्य मगोचे सुदिन ढवळीकर यांनी केले असले, तरी भाजप किंवा काँग्रेस (Goa Congress) यापैकी कोण सुदिन ढवळीकर यांना पहिल्या अडीज वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यास तयार असेल त्यांच्याबरोबर सरकार करण्याची तयारी मगोने ठेवली आहे. मगो कार्यकारिणीची बैठक होऊन तसा निर्णयही घेतल्याची माहिती हाती लागली आहे.

गोव्यात (Goa) ज्याप्रमाणे मतदान झाले आहे ते पाहिल्यास कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. मगोचे यावेळी किमान चार आमदार जिंकून येऊ शकतात अशी स्थिती आहे. अशा स्थितीत मगोचा पाठिंबा घेतल्याशिवाय कुणीही सरकार घडवू शकणार नाही अशी मगोच्या केंद्रीय समितीची ठाम धारणा आहे. त्यामुळे उद्या गरज पडली, तर मगो भाजपालाही पाठिंबा देऊ शकते. मात्र, त्यासाठी ढवळीकर यांना आधी मुख्यमंत्री करा ही अट घातली जाणार असल्याचे मगोच्या केंद्रीय समितीच्याच एका सदस्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT