Nilesh Cabral and Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कुडचडेत सहा उमेदवार रिंगणात

काब्राल-पाटकर लढतीकडे लक्ष

दैनिक गोमन्तक

केपे: कुडचडे मतदारसंघात यावेळी निवडणूक रिंगणात एकूण सहा उमेदवार उरले असून त्यांच्यात लढत होणार आहे. कुडचडेत दोन वेळा निवडून आलेले भाजपचे उमेदवार नीलेश काब्राल आणि काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर पहिल्यांदा निवडणूक लढवणारे अमित पाटकर यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Goa Election News)

भाजप (BJP) मधून नीलेश काब्राल, काँग्रेस मधून अमित पाटकर, मगोप मधून विठोबा (आनंद) प्रभुदेसाई, आप मधून गाब्रियल फर्नाडिस, आरजीतर्फे आदित्य देसाई तर अपक्ष म्हणून अजय बॉयर कुडचडेतून निवडणुकीत उतरले आहेत.

नीलेश काब्राल हे या मतदारसंघातील बलाढय उमेदवार असून ते सलग दोनदा भाजपच्या उमेदवारीवर कुडचडेतून विजयी झाले आहेत. काब्राल यांना या मतदारसंघात फक्त काँग्रेस उमेदवार प्रतिस्पर्धी असतो. यावेळी काँग्रेसने अमित पाटकर हा नवीन चेहरा देण्याचा डाव खेळला असून तो काब्राल यांच्यावर विरोधात कितपत भारी ठरू शकतो, हे दिसून येणार आहे. गेल्यावेळी काब्राल यांचे जुने प्रतिस्पर्धी श्याम सातार्डेकर यांनी गोसुमं कडून काब्राल विरोधात निवडणूक लढवली होती. यंदा त्यांनी आपला पाठिंबा पाटकर यांना दिला आहे. 'आप'ने (AAP) 2017 च्या निवडणुकीत जेम्स फर्नाडिस यांना उमेदवारी दिली होती. त्यांना केवळ दहा टक्के मते मिळाली होती. यंदा त्यांच्या जागी गाब्रियाल फेर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT