Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: गोव्यात त्रिशंकू विधानसभेचे संकेत

संभाव्य आमदारांना भाजपकडून गाजर?

दैनिक गोमन्तक

मडगाव: भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी यावेळी आपल्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार, असा दावा केला असला तरी प्रत्यक्षात गोव्यात त्रिशंकू विधानसभाच अस्तित्वात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत निकाल लागण्यापूर्वीच संभाव्य आमदारांच्या घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Goa Election News)

यावेळी गोव्यात भाजप (BJP) किंवा काँग्रेस पक्ष 16 जागांवरच थांबण्याची शक्यता असून लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही संभाव्य आमदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे, अशी माहिती मिळाली आहे. आतापर्यंत सावित्री कवळेकर, इजिदोर फर्नांडिस, विजय पै खोत, दीपक पाऊसकर आदींशी भाजप व काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी संधान साधले आहे.

भाजपकडून इन्कार

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हे आरोप फेटाळले. आमच्यावर दुसऱ्या पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा घेण्याची वेळच येणार नाही. विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

‘राष्ट्रवादी’शीही संधान

चोडणकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आमच्या काही उमेदवारांशी भाजप नेत्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही आवाज उठविल्यावर हे प्रयत्न बंद झाले असे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली.

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विश्वजीत राणे आणि माविन गुदिन्हो यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहेत. या तिघांनाही ‘आपणच पुढचा मुख्यमंत्री’ अशी स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळेच ते आमदार (MLA) फोडण्यासाठी सक्रिय झाले आहेत, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. आमच्या उमेदवारांनी त्यांना दाद दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT