Union Minister Shripad Naik Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: 'लोकशाहीचा विचार हा राजकारणाचा मूळ आधार'

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांनी पेडणे मतदार संघामधील भाजपच्या कार्यंकर्त्यांना आज संबोधित केले.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. याच पाश्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकिय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यामध्ये सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. त्यामुळे राज्यातीला राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. यातच सत्तेत असणाऱ्या भाजपने उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. (Shripad Naik Has Said That The Idea Of ​Democracy Is The Basis Of Politics)

मात्र मागील काही दिवसांपासून राज्यात पणजी मतदारसंघांची जोरदार चर्चा रंगली होती. या मतदारसंघातून अखेर भाजपने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना डावलून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपपासून फारकत घेत अपक्ष निवडणुक लढविण्याचे घोषित केले.

तर दुसरीकडे राज्यातील भाजपचे दिग्गज नेते प्रचाराच्या माध्यमातून जनतेला आपल्याकडे आकर्षित करत आहेत. यातच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांनी पेडणे मतदार संघामधील भाजपच्या कार्यंकर्त्यांना आज संबोधित केले.

ते यावेळी म्हणाले, लोकशाही ही राष्ट्रीयतेच्या आधारे फुलत असते. देशाविषयी, समाजाविषयी आपल्या मनात जी भावना असते त्याआधारे लोकशाहीची रुजवणूक होते. सामान्य लोकांचा विकास करणे हा लोकशाहीचा मूळ उद्देश असतो. राष्ट्रात राष्ट्रवादाचा विचार हा महत्त्वचा राहतो. देशातील प्रत्येक नागरिक राष्ट्रीयत्वासाठी जगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT