Sanjay Raut 
गोवा निवडणूक

Goa Assembly Election 2022: 'भाजप म्हणजे येड्यांची जत्रा'

''कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीत मध्ये नाव असणे गरजेचे असते, एवढं भाजप (BJP) नेत्यांना माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो,''

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन निवडणूक लढवावी, असे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, ''कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीत मध्ये नाव असणे गरजेचे असते, एवढं भाजप नेत्यांना माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो,''

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र (Maharashtra) सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले, आम्हाला गोव्याची निवडणूक काँग्रेससोबत लढवायची होती, परंतु काही स्थानिक नेत्यांमुळे युती होऊ शकली नाही. उद्या म्हणजेच मंगळवारी आमचे सरचिटणीस आणि एक मंत्री युतीबाबत बोलण्यासाठी गोव्यात जाणार आहेत. त्याचबरोबर मणिपूरमधील निवडणूक आम्ही काँग्रेससोबत मिळून लढू. वृत्तांवर विश्वास ठेवला तर शिवसेना गोव्यात 10 ते 15 जागा लढवू शकते.

गोव्यात शिवसेना 10-15 जागा लढवू शकते

शिवसेना 10-15 जागा लढवणार असल्याचे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी सांगितले होते. गोव्यात शिवसेना मित्रपक्षासोबत निवडणूक लढवणार का, असा सवाल त्यांनी करण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले की, आम्हीही गोव्यात जाणार असून त्यांचे नेतेही जाणार आहेत. गोव्याचे राजकारण 10-12 लोकांभोवती फिरते. गोव्यातील जनतेने सर्वसामान्यांना निवडून द्यावे, अशी आमची इच्छा आहे. या लोकांना आम्ही तिकीट देऊ.

गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार

गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 10 मार्चला लागणार आहेत. 21 जानेवारीपासून नामांकन सुरु होईल. 28 जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यावेळी कडक प्रोटोकॉल तयार केले आहेत. त्यानुसार 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही रॅली, रोड शो आणि पदयात्रेला परवानगी दिली जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT