Shivsena Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Assembly Elections 2022: गोव्यात आणि उत्तरप्रदेशात 'धनुष्यबाणाच्या' चिन्हावर शिवसेना लढवणार निवडणूक

गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण हेच चिन्ह मिळाले आहे. या चिन्हामुळे मतदानावर काही परिणाम होतो का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आदित्य ठाकरेंकडे जबाबदारी.

दैनिक गोमन्तक

Goa - Uttar Pradesh Assembly Elections 2022 : देशात पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्रात सत्तेत असलेला शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये राष्ट्रवादी कॅांग्रेस या पक्षा सोबत युती केली आहे. या राज्यात शिवसेनेला धनुष्यबाणचं निवडणूक चिन्ह असणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा एकही आमदार किंवा खासदार निवडून आला नाही. त्यामुळे गोवा (Goa) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) शिवसेनेला धनुष्यबाण ऐवजी दुसरं चिन्ह मिळण्याची शक्यता होती. मात्र आता गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला त्यांचं मूळ असलेलं धनुष्यबाण हेच चिन्ह मिळाले आहे. या चिन्हामुळे मतदानावर काही परिणाम होतो का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

गोवा विधानसभा (Goa Election) निवडणुकीत महाराष्ट्र राज्याप्रमाणे महाविकास आघाडी होईल अशी चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली. आणि शिवसेना राष्ट्रवादी कॅांग्रेस ची युती झाली. यामध्ये शिवसेना साधारण 10 ते 12 जागांवर लढणार आहे. आतापर्यंत शिवसेनेने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात पेडणे, म्हापसा, शिवोली, हळदोणे, पणजी, परये, वारपई, वास्को आणि केपे याठिकाणी शिवसेना निवडणूक लढवणार आहे.

तर उत्तरप्रदेशातून शिवसेना (Shivsena) 50 जागांवर लढण्याची शक्यता आहे. गोवा आणि उत्तरप्रदेशसाठी शिवसेनेला अधिकृत चिन्ह मिळालं आहे यावर अतुल भातखळकर यांनी, 'गोवा आणि उत्तरप्रदेशसाठी शिवसेनेला अधिकृत चिन्ह मिळालं आहे त्यामुळे शिवसेनेचा डिपॉझिट जप्त होणार आहे हे अधिकृतपणे कळेल.' असा टोला शिवसेनेला लगावला आहे.

आदित्य ठाकरेंकडे जबाबदारी

आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) वडिलाचं आजारपण आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी लक्षात घेता, गोवा आणि उत्तर प्रदेश येथिल निवडणुकीची धुरा स्वत: सांभाळत आहे. शिवसेनेकडून शैलेंद्र वेलिंगकर यांना पणजीमधून (Panjim) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे प्रचारासाठी गोव्याला जाणार आहे. गोव्यात शिवसेनेने 2017 मध्ये निवडणुका लढवल्या होत्या मात्र एकही जागा त्यांना निवडून आणता आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT