Goa Assembly Elections Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भरारी पथकाची वाढती डोकेदुखी; खरी कुजबूज!

दैनिक गोमन्तक

भरारी पथकाची डोकेदुखी

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अधिक गाजू लागली आहे. आयोगाने घालून दिलेली आचारसंहितेच्या संदर्भातली नियमावली परस्पर विरोधीपक्षवाले कधी मोडतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. यात झोपडपट्ट्या अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. उमेदवारासोबत 20 पेक्षा जास्त लोक झोपडपट्टीत फिरताना दिसले की एक गट दुसऱ्या गटाची तक्रार आयोगाच्या भरारी पथकाकडे करतो मग भरारी पथक येऊन चौकशी करते आणि पुन्हा विरोधी गटाचा उमेदवार दाखल होताच जुना गट भरारी पथकाकडे तक्रार करतो अशातच आता बाचाबाची वाढू लागली आहे. ∙∙∙

प्रचार की पाहुणचार

राज्यात निवडणूक प्रचार घरोघरी सुरू असला तरी तो आता मतदारांच्या सुख-दुःखे जाणून घेण्यापर्यंत पोहचला आहे. उमेदवारांनी मतदारांची मते मिळावी यासाठी त्यांच्या घरात बसून विचारपूस तसेच कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करू लागले आहेत. त्यांच्या घरात एखादे लहान मूल किंवा बाळ असेल, तर त्याला जवळ घेऊन उमेदवार वा पक्षनेते त्यांचा पक्ष लोकांची किती काळजी घेतो याचा आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळ्याच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी तसेच गोव्याबाहेरून आलेल्या पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी कुटुंबाच्या घरात प्रवेश करत चहा घेत मतदारांना आपलेसे करण्याची चाल खेळत आहेत. ज्या मतदारांच्या घरी हे राष्ट्रीय नेते जाणार आहेत त्या कुटुंबाचे सदस्य त्या नेत्याचे स्वागत करण्यास सज्ज असतात. ऐरवी या उमेदवारांना किंवा पक्षनेत्यांना मतदारांच्या घरी जाऊन थोडा वेळ घालवण्यास कधी शक्य झाले नाही ते आता निवडणूक जवळ आली तेव्हा मतांच्या नावाखाली घरी पोहचत आहेत. ∙∙∙

झोपडपट्टीवाल्यांचे भाग्य उजळले

निवडणुकीमुळे झोपडपट्टीवाल्यांचे भाग्य फारच उजळले आहे. राज्यातील विविध मतदारसंघात या झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यातील मतदान काही वेळा निर्णायक ठरते, त्यामुळे राजकारण्यांचा विशेषतः निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांचा अशा झोपडपट्टीवाल्यांवर डोळा असतो आणि निवडणूक म्हटली की हातावर नक्कीच हिरवा, लाल रंगाचा कागद पडतोच अशी अटकळही बांधली जाते. आता हेच पहा, गोव्याबाहेरील बड्या राजकारण्यांनी विशेषतः राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अशा झोपडपट्टीत कधी पाय ठेवला नसेल, पण मतांसाठी काहीही... त्यामुळेच आता या बड्या नेत्यांना अशा झोपडपट्टीत पाय ठेवताना नाकीनऊ येत आहेत. ∙∙∙

(Rising headaches for election commission squad in goa)

रात्रीस खेळ चाले...

निवडणूक आयुक्तांनी सरकारी कर्मचारी निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रचार कार्यात सहभागी झाल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले असले, तरी काही महाभाग रात्रीच्या वेळी ठरलेल्या घरात जाऊन पक्षीय प्रचारात सहभागी होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. आता त्या सरकारी कर्मचाऱ्यांजवळ प्रचार साहित्य नसले तरी ते ज्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी गळ घालीत आहेत त्याचे रेकॉर्डिंग केले जात असल्यामुळे हे सरकारी कर्मचारी जो रात्रीचा खेळ खेळत आहेत, तो अडचणीत येणारा ठरल्यास नोकरी गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ∙∙∙

ढवळीकरांनी सोपविली प्रचाराची धुरा

मडकई मतदारसंघात (Marcaim Constituency) मगो पक्षाचे उमेदवार सुदिन ढवळीकर यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र मिथिल ढवळीकर आणि बंधू दिलीप ढवळीकर यांनी स्वीकारली आहे. मडकई मतदारसंघात मगो पक्षाच्या प्रचाराच्यावेळेला कार्यकर्त्यांचीही चांगली उपस्थिती असते. विशेषतः महिला वर्ग उत्स्फूर्तपणे या प्रचारात सहभागी होत असल्याने सुदिन ढवळीकर यांना त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात प्रचारासाठी फिरण्याची गरजच भासत नाही आणि तेही खरे म्हणा, कारण मगो पक्षाचे राज्यभरात इतर अकरा ठिकाणी उमेदवार आहेत, मग त्यांच्या प्रचारासाठी मगोचे बडे नेते म्हटल्यावर सुदिन ढवळीकर यांनाच धाव घ्यावी लागते. त्यामुळे मडकईचा कारभार सध्या मिथिल आणि दिलीपवर आहे. मागच्या काही निवडणुकांत सुदिनच्या मतांची टक्केवारी वाढली आहे, आता या निवडणुकीत ही टक्केवारी कितपत राखली जाते, ते पहावे लागेल. ∙∙∙

भरारी पथकाची डोकेदुखी

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अधिक गाजू लागली आहे. आयोगाने घालून दिलेली आचारसंहितेच्या संदर्भातली नियमावली परस्पर विरोधीपक्षवाले कधी मोडतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. यात झोपडपट्ट्या अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. उमेदवारासोबत २० पेक्षा जास्त लोक झोपडपट्टीत फिरताना दिसले की एक गट दुसऱ्या गटाची तक्रार आयोगाच्या भरारी पथकाकडे करतो मग भरारी पथक येऊन चौकशी करते आणि पुन्हा विरोधी गटाचा उमेदवार दाखल होताच जुना गट भरारी पथकाकडे तक्रार करतो अशातच आता बाचाबाची वाढू लागली आहे. ∙∙∙

भिण्याची गरज नाही...

जस जशा निवडणुका (Goa Assembly Election) जवळ येत आहेत, तस तसे राजकीय वारे तापत आहे. अनेकजण निवडणुकी पूर्वीच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. प्रत्येक उमेदवाराला वाटत आहे की मीच निवडून येणार आहे. काही उमेदवारांना म्हणे चक्क मंत्रिपदाची शपथ घेतानाची स्वप्ने पडत आहेत. जनता देखील हुशार झाली आहे. दाराशी आलेल्या प्रत्येक उमेदवाराला सांगत आहे - ‘माझे मत तुम्हालाच, भिण्याची गरज नाही...’ ∙∙∙

कळंगुटमधील एकाला नडली धर-सोड वृत्ती!

कळंगुट (Calangute Constituency) मतदारसंघात ऐनवेळी भाजपमध्ये आयात केलेले जोसेफ सिक्वेरा आणि योग्य संधी साधून नेमक्या वेळी भाजमधून काँग्रेसमध्ये उडी घेतलेले मायकल लोबो हे तसे दोघेही मतदारसंघातील बलाढ्य तथा तुल्यबळ उमेदवार असल्याचे मानले जाते. या राजकीय उलथापालथींमुळे घोर निराशा झाली ती अगोदर भाजपमधून तृणमूलमध्ये प्रवेश करून व तिथे चार दिवसांचा पाहुणचार घेत लोबो यांनी भाजप सोडल्यानंतर स्वगृही परतलेले गुरुदास शिरोडकर यांची. त्यांना शेवटी भाजपची उमेदवारी मिळालीच नाही. ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशीच त्यांची अवस्था झाली आहे. तात्पर्य, त्यांना राजकारणातील धर-सोड वृत्ती फारच नडली आहे. ∙∙∙

आव्हाने राजकीय संन्यासाची

ही निवडणूक अनेक मतदारसंघात अटीतटीची ठरेल असा राजकीय पंडितांचा कयास आहे. काही उमेदवार तर परस्परांना राजकीय संन्यासाची आव्हाने प्रति आव्हाने देऊ लागले आहेत. त्यात गत निवडणुकीत नामुष्कीने पराभव पत्करलेल्यांचाही समावेश आहे. त्यांनी जर त्या पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन चुका सुधारल्या असत्या तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. एक गोष्ट खरी की या वेळचे एकंदर वारे पाहिले तर अनेकांवर राजकीय संन्यास घेण्याची पाळी येईल असेच दिसते. ∙∙∙

झोपडपट्टीवाल्यांचे भाग्य उजळले

निवडणुकीमुळे झोपडपट्टीवाल्यांचे भाग्य फारच उजळले आहे. राज्यातील विविध मतदारसंघात या झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यातील मतदान काही वेळा निर्णायक ठरते, त्यामुळे राजकारण्यांचा विशेषतः निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांचा अशा झोपडपट्टीवाल्यांवर डोळा असतो आणि निवडणूक म्हटली की हातावर नक्कीच हिरवा, लाल रंगाचा कागद पडतोच अशी अटकळही बांधली जाते. आता हेच पहा, गोव्याबाहेरील बड्या राजकारण्यांनी विशेषतः राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अशा झोपडपट्टीत कधी पाय ठेवला नसेल, पण मतांसाठी काहीही... त्यामुळेच आता या बड्या नेत्यांना अशा झोपडपट्टीत पाय ठेवताना नाकीनऊ येत आहेत. ∙∙∙

रात्रीस खेळ चाले...

निवडणूक आयुक्तांनी सरकारी कर्मचारी निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रचार कार्यात सहभागी झाल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले असले, तरी काही महाभाग रात्रीच्या वेळी ठरलेल्या घरात जाऊन पक्षीय प्रचारात सहभागी होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. आता त्या सरकारी कर्मचाऱ्यांजवळ प्रचार साहित्य नसले तरी ते ज्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी गळ घालीत आहेत त्याचे रेकॉर्डिंग केले जात असल्यामुळे हे सरकारी कर्मचारी जो रात्रीचा खेळ खेळत आहेत, तो अडचणीत येणारा ठरल्यास नोकरी गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ∙∙∙

ढवळीकरांनी सोपविली प्रचाराची धुरा

मडकई मतदारसंघात मगो पक्षाचे उमेदवार सुदिन ढवळीकर यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र मिथिल ढवळीकर आणि बंधू दिलीप ढवळीकर यांनी स्वीकारली आहे. मडकई मतदारसंघात मगो पक्षाच्या प्रचाराच्यावेळेला कार्यकर्त्यांचीही चांगली उपस्थिती असते. विशेषतः महिला वर्ग उत्स्फूर्तपणे या प्रचारात सहभागी होत असल्याने सुदिन ढवळीकर यांना त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात प्रचारासाठी फिरण्याची गरजच भासत नाही आणि तेही खरे म्हणा, कारण मगो पक्षाचे राज्यभरात इतर अकरा ठिकाणी उमेदवार आहेत, मग त्यांच्या प्रचारासाठी मगोचे बडे नेते म्हटल्यावर सुदिन ढवळीकर यांनाच धाव घ्यावी लागते. त्यामुळे मडकईचा कारभार सध्या मिथिल आणि दिलीपवर आहे. मागच्या काही निवडणुकांत सुदिनच्या मतांची टक्केवारी वाढली आहे, आता या निवडणुकीत ही टक्केवारी कितपत राखली जाते, ते पहावे लागेल. ∙∙∙

भिण्याची गरज नाही...

जस जशा निवडणुका जवळ येत आहेत, तस तसे राजकीय वारे तापत आहे. अनेकजण निवडणुकी पूर्वीच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. प्रत्येक उमेदवाराला वाटत आहे की मीच निवडून येणार आहे. काही उमेदवारांना म्हणे चक्क मंत्रिपदाची शपथ घेतानाची स्वप्ने पडत आहेत. जनता देखील हुशार झाली आहे. दाराशी आलेल्या प्रत्येक उमेदवाराला सांगत आहे - ‘माझे मत तुम्हालाच, भिण्याची गरज नाही...’ ∙∙∙

कळंगुटमधील एकाला नडली धर-सोड वृत्ती!

कळंगुट मतदारसंघात ऐनवेळी भाजपमध्ये आयात केलेले जोसेफ सिक्वेरा आणि योग्य संधी साधून नेमक्या वेळी भाजमधून काँग्रेसमध्ये उडी घेतलेले मायकल लोबो हे तसे दोघेही मतदारसंघातील बलाढ्य तथा तुल्यबळ उमेदवार असल्याचे मानले जाते. या राजकीय उलथापालथींमुळे घोर निराशा झाली ती अगोदर भाजपमधून तृणमूलमध्ये प्रवेश करून व तिथे चार दिवसांचा पाहुणचार घेत लोबो यांनी भाजप सोडल्यानंतर स्वगृही परतलेले गुरुदास शिरोडकर यांची. त्यांना शेवटी भाजपची उमेदवारी मिळालीच नाही. ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशीच त्यांची अवस्था झाली आहे. तात्पर्य, त्यांना राजकारणातील धर-सोड वृत्ती फारच नडली आहे. ∙∙∙

आव्हाने राजकीय संन्यासाची

ही निवडणूक अनेक मतदारसंघात अटीतटीची ठरेल असा राजकीय पंडितांचा कयास आहे. काही उमेदवार तर परस्परांना राजकीय संन्यासाची आव्हाने प्रति आव्हाने देऊ लागले आहेत. त्यात गत निवडणुकीत नामुष्कीने पराभव पत्करलेल्यांचाही समावेश आहे. त्यांनी जर त्या पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन चुका सुधारल्या असत्या तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. एक गोष्ट खरी की या वेळचे एकंदर वारे पाहिले तर अनेकांवर राजकीय संन्यास घेण्याची पाळी येईल असेच दिसते. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT