Rahul Gandhi & Girish Chodankar 
गोवा निवडणूक

Goa Election 2022: 'गोव्यातील प्रदूषणकारी प्रकल्पांना केंद्रात जीव तोडून विरोध करु'

आगामी सरकार हे काँग्रेसचेच (Congress) असणार आणि ते बनविण्यासाठी आम्हाला तृणमुल किंवा आप यांच्याशी युती करण्याची गरजच पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेसने शेतकरी विरोधी बिलाला लोकसभेत ज्यातरेने विरोध केला त्याचप्रमाणे गोव्यात येऊ घातलेल्या तीन लिनीयर प्रकल्पाना आम्ही विरोध करू. हे प्रकल्प गोव्यात उभे राहणार नाहीत हे आम्ही पाहून घेऊ. आम्हाला गोवा कोळशाचे आगार करायचे नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले. आज मडगावात (Margao) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी गोव्यात येणारे आगामी सरकार हे काँग्रेसचेच (Congress) असणार आणि ते बनविण्यासाठी आम्हाला तृणमुल किंवा आप यांच्याशी युती करण्याची गरजच पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Rahul Gandhi Said We Will Oppose The Polluting Project In Goa At The Center)

गोव्यातील युवकांना रोजगार व त्यासाठी 500 कोटी रुपयांची तजवीज, बंद पडलेला पर्यटन व खनिज उद्योगाला चालना देणे आणि गोव्याच्या पर्यावरणाच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे हा काँग्रेसचा गोव्यात कार्यक्रम असेल असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, गोव्यातील बेकार युवकांना रोजगार कसा मिळवून देणार, ठप्प पडलेल्या पर्यटन व्यवसायास कशी उर्जितावस्था आणणार, गोव्याचे पर्यावरण कसे सांभाळणार यावर प्रधानमंत्री का बोलत नाहीत. त्यापेक्षा गोव्याला मुक्ती उशिरा कुणामुळे मिळाली हे त्यांना सांगावे असे वाटते असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. प्रधानमंत्र्यांना लोकांचे लक्ष मुख्य मुद्द्यापासून दूर न्यायचे आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप असे ते म्हणाले.

काल गोव्यात आले असता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नेहरूंच्या धोरणामुळे गोव्याला 14 वर्षे उशिरा मुक्ती मिळाली. त्यामुळे गोवेकरांचा काँग्रेसवर राग आहे असे वक्तव्य केले होते. यावर त्यांना प्रश्न केला असता, गोव्याला मुक्ती उशिरा का मिळाली यावर यापूर्वी इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपली मते मांडली आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर काय परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणात उद्भवली होती याचा अभ्यास मोदींनी केला नाही का असा सवाल केला. नोटबंदी, लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणे, 50 लाख नोकऱ्या निर्माण करणे या सारखे वायदे ते आता का देत नाहीत. मोदी सरकार सर्व स्थरावर अपयशी ठरले असून त्यामुळेच लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ते असे नको असलेले मुद्दे चर्चेत आणतात असा आरोप त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे केंद्रीय नेते के. सी. वेणूगोपाळ, पी. चिदंबरम (P. Chidambaram), दिनेश गुंडू राव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), खासदार फ्रान्सिस सार्दीन व अन्य नेते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT