Narendra Modi  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर

नरेंद्र मोदी यांची आज म्हापशात सभा

दैनिक गोमन्तक

म्हापसा: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. म्हापसा येथील बोडगेश्वर मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या जाहीर जनसंकल्प सभेची तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी भव्य असा सभामंडप उभारण्यात आला आहे. आकर्षक मंच आणि विद्युत रोषणाईमुळे परिसराला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. (Narendra Modi BJP Goa Updates)

विधानसभा निवडणुकांसाठी होणारे मतदान केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गोव्यात जाहीर सभेद्वारे लोकांना संबोधित करण्यासाठी येत आहेत. पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी गोव्यात येत असल्याने उत्सुकता स्वाभाविक आहे. सुरवातीला ही सभा पणजी येथे होणार होती. मात्र, आता ती उत्तर गोव्यातील म्हापसा (Mapusa) येथे होत आहे.

दहा हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहू शकतील अशी सोय करण्यात आली असून यासाठी बोडगेश्वर मैदानावर भव्य सभास्थळ उभारण्यात आले आहे. यासाठी कडेकोट व्यवस्था करण्यात आली असून लोकांना बसण्यासाठी खुच्र्यांची सोय करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बॅरिकेट बांधण्यात आली आहेत. तर मुख्य सभा स्थळावर व्यासपीठ उभारले असून त्यावर नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांचे कटवेज लावले असून त्यावर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर यांची छायाचित्रे लावली आहेत. त्याखाली स्थिरता आणि विकास भाजपवर विश्वास असे लिहिण्यात आले आहे. म्हापसा शहरात लावलेले स्वागत फलक, स्वागत कमानी लोकांचे आकर्षण ठरल्या आहेत. देशाचे पंतप्रधान येणार याची उत्सुकता गोमंतकीय नागरिकांना लागली आहे.

भाजपचे दिग्गज प्रचारात
पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने (BJP) देशाच्या दिग्गजांना प्रचारात उतरवले आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी वास्को, डिचोली, साखळी फोंडा या ठिकाणी जाहीर सभा घेतली. शहा यांच्या साखळी व डिचोलीतील सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे मोदी यांनी प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना पाचही राज्यात भाजपला बहुमताने सत्तेत येईल असा दावा केला.

केजरीवाल दोन दिवसीय दौऱ्यावर
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गुरुवारी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) राज्यातील विविध मतदारसंघांना भेटी देणार आहेत. दोन दिवसांत ते विविध सभांना संबोधित करतील. शिरोडा, पर्ये, मये, सांताक्रुझ, वेळी, बाणावली, कुठ्ठाळी आणि नावेली या आठ मतदारसंघात सभा होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT