Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मोदींच्या सभेचा मांद्रेत प्रभाव पडणार नाही: लक्ष्मीकांत पार्सेकर

मांद्रेतील जनता अपक्ष उमेदवार म्‍हणून मला निवडुन देणार असा विश्‍‍वास लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

हरमल: विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची म्हापशात सभा होणार असून, माझ्या मांद्रे मतदारसंघातील मतदारांवर या सभेचा मुळीच परिणाम होणार नाही. मांद्रेतील जनतेचा निर्णय झाला असून, अपक्ष उमेदवार म्‍हणून मला निवडून देणार असल्याचा विश्‍‍वास लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी व्यक्त केला.

मराठवाडा (Marathwada) मांद्रे येथे माजी मुख्यमंत्री पार्सेकर घरोघरी प्रचारांत गाठले असता,त्यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचे स्टार प्रचारक आम्ही त्या पक्षात 1989 पासून असताना अनुभवले आहेत. जोपर्यंत स्थानिकांतुन नेतृत्व उदयास येत नाही, लोकमान्यता मिळत नाही तोपर्यंत स्टार व्यक्तीचा प्रभाव होत नाही. मतांत रूपांतर होणे आवश्यक असते. मात्र सध्याचे उमेदवार हे खुजे असून त्यांच्या विषयीची चीड मतदारांत असून सत्ता व ताकदीच्या जोरावर काही गोष्टी अंगलट येणार असल्याचे निश्चित आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आपणास नितांत आदर असून, त्यांनी तास-एक तास भाषण केल्याने काहीही उपयोग मांद्रेतील मतदारांवर होणार नसल्याचे पार्सेकर म्‍हणाले. मांद्रेच्या लोकप्रतिनिधींनी पुन्हा पाच वर्षे मागावी म्हणजे पाणी प्रकल्प, वीज प्रकल्प, तुये इस्पितळ प्रकल्प व 2016 साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी केली होती, तो इलेक्ट्रॉनिक सिटी (Electronic City) प्रकल्प पुन्हा पाच वर्षे प्रलंबित ठेवण्याचा डाव आहे का, असा सवाल पार्सेकरयांनी केला. साधारणपणे 70 ते 75 टक्के घरोघरी प्रचार पूर्ण झाला असून शिल्लक दिवसात शंभर टक्के अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT