Nana Patole allegations on BJP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

विश्वासघातकी भाजपला लोक पराभूत करतील : नाना पटोले

भाजपच्या गैरकारभारामुळे गोव्यातील जनता त्रस्त झाल्याचाही टोला

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपने प्रत्येक क्षेत्रात राज्यातील लोकांचा विश्वासघात केलेला असून, कोविड काळात लोकांचा जीव घेतला, या कारणामुळे भाजपला लोक पराभूत करणार, असा निशाणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी म्हटले. भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर उघड झाला आहे, असेही पटोले म्हणाले. पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. (Nana Patole allegations on BJP News Updates)

भाजपच्या गैरकारभारामुळे गोव्यातील जनता त्रस्त झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात लोकांना त्रास सहन करावा लागला आहे, त्यामुळे मतदार भाजपचा पराभव करुन काँग्रेसला निवडून देतील, असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला. भाजप सरकारने कोविड रुग्णांची हत्या केली, त्यासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे आणि मला खात्री आहे की गोव्यातील लोक त्यांचा पराभव करतील, अशा शब्दात पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपने राज्यातील खनिज व्यवसाय बंद केल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे. भाजपने खनिज व्यवसाय बंद करुन लोकांना त्रास दिला. तसेच भाजप सरकारने आरोग्य क्षेत्रातही भ्रष्टाचार केला आहे, असंही ते पुढे म्हणाले.

आगामी निवडणुकीत पणजीची जागाही काँग्रेसच जिंकेल, असे ते म्हणाले. 'आम्ही पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांना भेटलो आहे आणि आम्हाला विश्वास आहेत ते आमच्यासोबत राहणार. पणजीशिवाय शेजारच्या मतदारसंघातही ते आम्हाला मदत करतील.’’ असे पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, ते साखळी मतदारसंघामध्ये प्रचारासाठी घरोघरी फिरले असता त्यांना कळाले की जनता भाजपवर नाराज आहे आणि त्यांचा पराभव नक्की करणार. लोक मला सांगत होते की मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, ज्यांच्याकडे राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात एकच वॅगन-आर गाडी होती. त्यांनी संपत्ती कशी मिळवली हे लोकांना माहीत आहे आणि भाजपविरोधातील हा राग त्यांना घरी पाठवेल, असा टोलाही पटोलेंनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT