Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

पणजीतील पराभव निराशाजनक मात्र...: उत्पल पर्रीकर

पणजीतील लोकांनी बाबूश मोन्सेरात यांना पसंती दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी मतदारसंघात भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर यांचा 713 मतांनी पराभव केला आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना पर्रीकर म्हणाले, एक अपक्ष उमेदवार म्हणून मी चांगली लढत दिली. सर्व मतदारांचे मी आभार मानतो. गोवा विधानसभा निवडणुकीची ही लढाई समाधानी होती. मात्र, पराभव किंचित निराशाजनक आहे.

पणजीत उत्पल पर्रीकर यांच्या पाठीशी अनेक भाजप समर्थक उभे होते. मात्र पर्रीकर यांना विजय खेचून आणता आला नाही. पणजीतील लोकांनी बाबूश मोन्सेरात यांना पसंती दिली. भाजपने (BJP) पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजप त्यांना पणजी व्यतिरिक्त इतर मतदारसंघातून उमेदवारी देण्यास तयार होता.

मात्र पर्रीकर यांनी सर्व 'ऑफर्स' नाकारल्या. त्याचबरोबर शिवसेनेने पर्रीकर यांना जाहीर पाठिंबा देत आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावला होता. आम आदमी पार्टीने देखील पर्रीकर यांना पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली.

प्रचारादरम्यान बाबूश मोन्सेरात यांनी विजय संपादन करण्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा अखेर खरा ठरला. पणजीच्या (Panaji) जनतेने मोन्सेरात यांना विजयी केले. भाजप समर्थक आणि नेते या निकालानंतर आनंद व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT