Michael Lobo Dainik Gomantak
गोवा निवडणूक

कळंगुटमध्ये लोबोंची होणार का हॅट्ट्रिक?

जोसेफ सिक्वेरा, आग्नेल फर्नांडिस यांचे जोरदार प्रयत्न, लढत ठरणार लक्षवेधी

Santosh Govekar

कळंगुट : जागतिक कीर्तीचे पर्यटन केंद्र आणि किनाऱ्यांची राणी म्हणून परिचित असलेल्या कळंगुटमध्ये सध्या भाजप आणि कॉंग्रेस पक्षांबरोबरच आम आदमी आणि तृणमूल या प्रादेशिक पक्षांचे मिळून एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघावर भाजपच्या बॅनरखाली सलग दोनवेळा निवडून आलेल्या माजी मंत्री मायकल लोबो यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधण्यासाठी यंदा पक्षांतर करुन राष्ट्रीय कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे राज्यात जवळपास संपून जाण्याच्या मार्गावर असलेल्या कॉंग्रेसला निश्चितच बळकटी मिळाली आहे. कळंगुट कॉंग्रेसचे माजी शिलेदार आग्नेलो फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा आणि ॲन्थनी मिनेझीस यांची जोडगोळी सध्या फुटून कळंगुटमध्ये मोठी राजकीय उलथापालथ निर्माण झाल्याचे दिसते आहे. (Michael Lobo News Updates)

जोसेफ सिक्वेरा यांनी ऐनवेळी भाजपशी (BJP) सूत जुळवून कळंगुटमधून ते निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. दुसऱ्या बाजूने कॉंग्रेसने मायकल लोबोंना उमेदवारी जाहीर केल्याचे दिसताच कॉंग्रेसशी रक्ताचे नाते असल्याचे सांगणारे आग्नेलो फर्नांडिस आणि ॲन्थनी फर्नांडिस यांनीही त्याचक्षणी कॉंग्रेसशी (Congress) फारकत घेऊन तृणमूलशी नाते जोडले. कॉंग्रेसचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस आणि ॲन्थनी मिनेझीस यांनी जोसेफ सिक्वेरासह गेले सहा महिने कळंगुटमध्ये कॉंग्रेसचा प्रचार करून जंग जंग पछाडले होते, त्या प्रचाराचा काहीसा लाभ यंदा लोबोंना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कऴंगुटमधून निवडणूक लढविणारे आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सुदेश शिरोडकर, तृणमूलचे ॲन्थनी मिनेझीस, भाजपचे सिक्वेरा अपक्ष रिकार्डो डिसौझा यापैकी सर्वच उमेदवार लोबोंचे एकेकाळचे मित्र होते. त्यामुळे एक दुसऱ्यांची उणीधुणी काढण्यात सारेच व्यग्र असल्याने लोकांचे मनोरंजन अन् प्रबोधनही होत आहे. कॉंग्रेसच्या नौकेचे सुकाणू पकडलेले मायकल लोबो यंदा राज्यभरात फिरत असल्याने या गोष्टीचा त्यांचे विरोधक बऱ्यापैकी लाभ उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कळंगुटमध्ये कॉंग्रेस, भाजप सहित आम आदमी पक्ष आणि तृणमूल यांच्यात चुरशीची लढत होणार हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa News: पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय; वाचा गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT