Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

‘काणकोणच्या भविष्याला चालना देणारा जाहीरनामा’

मुंबईचे आमदार गायकवाड यांचा विश्‍वास

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोणचे भाजपचे उमेदवार रमेश तवडकर यांनी तालुक्याच्या भविष्याला चालना देणारा जाहीरनामा तुमच्या समोर मांडला आहे. काणकोणच्या जनतेला समर्पित असा हा जाहीरनामा आहे, असे प्रतिपादन मुंबईहून आलेले आमदार गायकवाड यांनी केले. काणकोण येथील जुन्या बसस्थानकावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

काणकोण भाजपच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन आमदार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उमेदवार रमेश तवडकर, नगराध्यक्ष सायमन रिबेलो,‌ माजी आमदार सुनिल हेगडे, माजी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, नगरसेवक बाकल पागी, मनुजा नाईक गावकर, चंदा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. गायकवाड पुढे म्हणाले, की गोव्यात स्थिर सरकार येणे आवश्यक आहे. तरच विकास होऊ शकतो. भाजप जेव्हा जाहीरनाम्यात एखाद्या गोष्टीचा समावेश करते ती गोष्ट पूर्ण करण्याकरता प्रयत्नकरते.

उमेदवार तवडकर म्हणाले, की काणकोणचा सर्वागिण विकास हे माझे ध्येय आहे. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाईन. जाहीरनाम्यातील कामे प्राधान्याने हाती घेतली जातील. चोवीस तास पाणी, पाळोळे - आगोंद किनाऱ्याचे सुशोभीकरण, चापोली, गावणे धरणे पर्यटन स्थळे बनविणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे माझे ध्येय आहे. या सभेला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मनीष पांडेची चित्त्यासारखी झेप! हवेत उडून टिपला अफलातून झेल; विराट कोहलीही झाला 'शॉक', रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे मिथुन राशीत आगमन: 14 मे पासून 'या' 4 राशींचे नशीब फळफळणार; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार मोठे यश!

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

SCROLL FOR NEXT