luizinho faleiro & Mamata Banerjee Dainik Gomantak
गोवा निवडणूक

तृणमूलच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन लुईझीन फालेरोंना डच्चू

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो (luizinho faleiro) यांना या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून खाली उतरविण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील निवडणुकीवर फारसा प्रभाव टाकू न शकलेले आणि त्यामुळे तृणमुल काँग्रेस पक्षाच्या बॅड बुक्समध्ये गेल्याचे सांगितले जात असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो (luizinho faleiro) यांना या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून खाली उतरविण्यात आले आहे. (Luizinho Faleiro Removed From Tmc Post National Vice President Post)

बंगालात होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी पूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली असून त्याजागी 20 सदस्यांची पर्यायी गाभा समिती नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. या समितीवर आतापर्यं आठ सदस्यांची नियुक्ती केली असून या आठ सदस्यात फालेरो यांच्या नावाचा समावेश नाही.

गोव्यात प्रवेश केल्यानंतर तृणमुलने मोठ्या अपेक्षा ठेवत पक्षाची सूत्रे फालेरो यांच्याकडे दिली होती. मात्र गोव्यातील निवडणुकीवर फालेरो आपला कुठलाही प्रभाव पाडू शकले नव्हते. उलट त्यांच्या स्वतःचा नावेली मतदारसंघातही ते प्रभावहीनच दिसले. या साऱ्या पार्श्वभूमीवर ही नवीन घटना घडली असून हा निर्णय म्हणजे फालेरो यांना दिलेला डच्चू असेच राजकीय जाणकार मानत आहेत.

तृणमुलने फालेरो याना फातोर्डा (Fatorda) मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगितले होते. मात्र आपला पराभव होणार या भीतीने त्यांनी हा प्रस्तावही फेटाळून लावला होता. त्यामुळे आय पॅकचे प्रशांत किशोर यांच्यासह गोवा प्रभारी महुआ मोईत्रा हे त्यांच्यावर नाराज झाले होते.

दरम्यान या संबंधी तृणमूल पक्षाच्या (Trinamool Congress) गोवा कार्यकरिणीच्या एका पदाधिकाऱ्याला विचारले असता, फालेरो यांना डच्चू दिलेला नाही तर पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. कालांतराने नवीन कार्यकारिणी गठित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT