Kanhaiya Kumar

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

Goa Election: कन्हैया कुमार दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर

कॉंग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेला युवा नेता कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर येणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोव्याचाही समावेश आहे. राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा नारळही फोडला आहे. सत्तेमध्ये पुन्हा एकदा परतण्यासाठी भाजप आपली पूर्ण ताकदज पणाला लावत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी कंबर कसली आहे. कॉंग्रेससह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गोव्यामध्ये हजेरी लावली आहे. यातच आता कॉंग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेला युवा नेता कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर येणार आहे.

दरम्यान, 6 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कन्हैया कुमार ‘बहुजन संवाद’ या कार्यक्रमात ओ.बी.सी, एस.सी, एस.टी. समाजातील प्रमुख नेत्यांशी म्हापसा टॅक्सी स्टॅंड येथे संवाद साधणार आहेत. शुक्रवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता MCC हॉल येथे कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजीत ‘युवा स्पंदन’ या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

तसेच, 7 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजीत राजभवनावरील धडक मोर्चाचे नेतृत्वही कन्हैया कुमार करणार आहेत. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित असतील. कॉंग्रेस पक्षातर्फे नाकर्त्या भाजप सरकारविरोधील आरोपपत्राची एक प्रत माननीय राज्यपालांनाही देण्यात येणार आहे. कन्हैया कुमार यांच्या दौऱ्यामुळे गोव्यातील युवा वर्गामध्ये स्फुर्तीचे वातावरण पसरले असून त्यांना भेटण्यास व त्यांचे मनोगत ऐकण्यास सारे उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Sopo Tax Protes: मालवाहू वाहनांवरील सोपो वसुली रद्द करा! व्यापारी संघटनेची आक्रमक मागणी; मडगावात वसुली ‘माफिया पद्धतीने’ होतेय

गोवा हीच एक प्रयोगशाळा! संपादकीय

Viral Video: "शाळाच तोडून टाकीन!" छोट्या डॉनची थेट मास्तरांना धमकी, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हक्काबक्का; म्हणाले, 'बच्चा खतरनाक है भाई'

खरी कुजबुज : कोणी विद्यार्थी देता का ?

Cylinder New Update: सावधान! ई-केवायसी न केल्यास गॅस सिलिंडरची डिलिव्हरी होणार बंद; 1 मे पासून नवीन नियम लागू, आजच करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT