Savitri Kavalekar

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

आपण सांगेतील की बाहेरची हे जनता ठरविणार; सावित्री कवळेकर

मतदारांनी जो आपल्यावर विश्वास दाखविला, त्याला गेल्या पाच वर्षात आपण तडा जाऊ दिला नाही आणि यापुढेही जाऊ देणार नाही, असे वचन भाजपा महिला मोर्चा राज्य उपाध्यक्ष सावित्री कवळेकर यांनी दिले.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

सांगे: आपण सांगेतील की बाहेरची हे सांगेतील जनता ठरविणार आहे. विरोधकांनी त्याची चिंता करू नये. नेत्रावळी पंचायत क्षेत्र ही आपली जन्मभूमी आहे. गेल्या निवडणुकीत सहा हजार मतदारांनी जो आपल्यावर विश्वास दाखविला, त्याला गेल्या पाच वर्षात आपण तडा जाऊ दिला नाही आणि यापुढेही जाऊ देणार नाही, असे वचन भाजपा महिला मोर्चा राज्य उपाध्यक्ष सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी दिले.

नेत्रावळी येथे कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक, उपाध्यक्ष सदानंद गावडे, महेश गावकर, नगरसेवक मेशु डिकॉस्ता, चंदन उनंदकर, उदय गावकर, चंद्रकांत गावकर, नानू भांडोळकर, संतोष गावकर, नानू भांडोळकर, संदीप मळकर्णेकर, प्रशांत गावकर, प्रणय कावरेकर, जानू झोरे, प्रतिभा वेळीप आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कवळेकर म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात सांगेतील जनतेच्या सुख दुःखात सहभागी होऊन सेवा करताना आपल्याला कुणीही बाहेरची असे म्हटले नाही. आता निवडणूक जवळ येताच मी बाहेरची म्हणून विरोधकांना साक्षात्कार झाला काय. लोकशाहीत कोणालाही कोणत्याही मतदारसंघात जाऊन निवडणूक लढविण्याचा अधिकार दिलेला आहे. आपले काम पाहून पक्ष आपल्याला उमेदवारी देणारे हे लक्षात येताच पत्रकार परिषद घेऊन आपण बाहेरची असल्याचा कांगावा केला जात आहे त्याला सांगेतील जनता फसणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.

अध्यक्ष नवनाथ नाईक म्हणाले, आपण जिल्हा पंचायत निवडणुकीत सलग दोन वेळा निवडून आलो असताना तिसऱ्या वेळी तूच का? असा प्रश्न विचारून आपली उमेदवारी कापण्यात आली. तर मग प्रत्येक वेळी भाजपचा तोच उमेदवार म्हणून सांगेतील कार्यकर्त्यांनी का स्वीकारावा? असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी चंदन उनंदकर, महेश गावकर, प्रणय कावरेकर, प्रतिभा वेळीप, मेशु डिकॉस्ता यांनी आपले विचार व्यक्त केले. मनोज पर्येकर यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद गावडे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT