Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: बाणावली मतदारसंघात चर्चिलची इभ्रत पणाला लागली आहे

कमी मतदानाने नागरिकांत आश्‍चर्य

दैनिक गोमन्तक

मडगाव: शेवटची निवडणूक लढविणारे आमदार चर्चिल आलेमाव आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष या दोघांचीही राजकीय इभ्रत जिथे पणाला लागली आहे, त्या बाणावली मतदारसंघात राज्यात सर्वांत कमी म्हणजे 70 टक्के मतदान झाले. त्यामुळे चर्चिल आपली ही शेवटची इनिंग यशस्वीपणे पूर्ण करतील, की या शेवटच्या डावात त्यांचा सपशेल पराभव होणार हे आता 10 मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे.

मागच्या काही दिवसांत या मतदारसंघातून पैशांचा धूर निघत होता. साम, दाम, दंड, भेद नीती सर्व उमेदवारांनी वापरली असली तरी या मतदारसंघात मतदार नेमका कुणाच्या बाजूने आहे, हा अंदाज लावणे कठीण झाले आहे. आवाज न करणारे मतदार कुणाच्या पारड्यात दान टाकणार, यावर आता सर्वांची मदार आहे. चर्चिल आलेमाव यांच्यासह या मतदारसंघात ‘आप’चे वेंझी व्हिएगस आणि काँग्रेसचे (congress) टोनी डायस अशी तिरंगी लढत होणार असून यात कुणाची सरशी होणार हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT