Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

साखळीत 5 हजार मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री सावंत यांचा दावा

2012 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी साखळीत प्रचार करून देखील माझाच विजय झाला होता, असे सावंत म्हणाले.

Akash Umesh Khandke

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. यातच आता साखळीतून निवडणूक लढवलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या विजयाचे भाकीत केले आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोवा विधानसभा ​निवडणुकीत माझा पराभव व्हावा म्हणून सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न केले. मात्र, याचा काहीही फायदा होणार नाही. मी साखळीतून पाच हजार मताधिक्याने निवडून येणार. (Goa Election News)

2012 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी साखळीत प्रचार करून देखील माझाच विजय झाला होता. त्यावेळी मी सात हजार मतांनी निवडून आलो होतो.यावेळी पाच हजार मताधिक्याने ​निवडून येणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत दिल्लीला रवाना
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत (Pramod Sawant) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास दिल्लीला रवाना झाले आहेत. मंगळवारी सावंत आणि प्रधानमंत्री मंत्री मोदी यांची भेट होणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सावंत आणि गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी 10 तारखेला गोव्याच्या जनतेने कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे.

गोव्यात कॉंग्रेसचे पारडे जड?
देशातील बहुसंख्य माध्यम समूहाने केलेल्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्डच्या आघाडीला सर्वाधिक 16 ते 18 जागा मिळतील तर भाजपला 14 ते 16 जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात (Goa) 2017 प्रमाणेच त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे अंदाज या चाचण्यांमधून पुढे येत आहे. यामुळे मगोप-तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अपक्षांचे महत्त्व वाढणार असून ते सत्तेत महत्वाची भूमिका बजावणार असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

SCROLL FOR NEXT