Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मी प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होण्यास तयार: गिरीश चोडणकर

आम्हाला गोव्यात काही मतदारसंघात खूप कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे : पी चिदंबरम

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पक्षाला 11 जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत गिरीश चोडणकर यांनी गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे.

चोडणकर म्हणाले, "जनतेने भाजपला कौल दिला आहे. आम्हाला गोवेकरांचा निर्णय मान्य आहे. मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत गोवा कॉंग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार आहे." काँग्रेसचे 7 ते 9 उमेदवार मतांच्या विभागणीमुळे हरल्याचा दावाही त्यांनी केला.

या निवडणुकीत तरुण, नव्या आणि शिक्षित उमेदवारांनी चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे गोव्यात एक जबाबदार विरोधीपक्ष म्हणून काँग्रेस कामगिरी बजावेल, असे वक्तव्य गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केले आहे. मात्र हा निकाल अनपेक्षित आहे असेही ते पुढे म्हणाले.

आम्हाला गोव्यात काही मतदारसंघात खूप कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. गोव्यातील (Goa) जनतेने राज्याची धुरा पुन्हा भाजपच्या (BJP) हातात सोपवण्याचा निर्णय दिला आहे आणि आम्हाला तो मान्य आहे, असं पी चिदंबरम म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

Elton D Costa: "विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडं!" आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी भक्तीभावाने घेतले दर्शन

Goa Agriculture: "सुपीक शेतजमिनींवर एकही प्रकल्प नकोच!" दुधाला तातडीने हमीभाव वाढ द्या ,भारतीय किसान संघाचा सरकारला थेट इशारा

Consumer court: अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना न्यायालयाचा मोठा झटका! कार्यक्रमाला दांडी मारणे पडले महाग; ३ लाखांच्या दंडासह नुकसान भरपाईचा आदेश

Goa health Camp: 14 महिलांमध्ये 'बेनाइन' स्तनगाठी; 163 नागरिकांची तपासणी, धारबांदोडा येथे कर्करोग निदान शिबिर

SCROLL FOR NEXT