Goa Politics
Goa Politics  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

युती झाली तरीही मांद्रेत काँग्रेसच

Shreya Dewalkar

Goa Politics : युती झाली तरी मांद्रे मतदारसंघातून केवळ काँग्रेसच्या हात निशाणीवरच निवडणूक लढवू आणि 2022 च्या निवडणुकीत 2017 ची पुनरावृत्ती करू. तसेच राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यांनी काँग्रेस(Congress) पक्षाचाच उमेदवार पुन्हा निवडून आणू, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.

मोरजी येथील मांगरदेव सभागृहात मोरजी पंचायत क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षण मंत्री तथा काँग्रेस उपाध्यक्ष संगीता परब, उपाध्यक्ष बाबी बागकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, युवा नेते सचिन परब, ज्येष्ठ नेते गोपाल परब, मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर, महिला काँग्रेसच्या रेखा परब, कृष्णा परब, ब्लाक मास्कारेन्स, लक्ष्मीकांत शेटगावकर आदी उपस्थित होते.

काँग्रेस उपाध्यक्ष संगीता परब म्हणाल्या, भाजपशी संगनमत करून गोव्यात शिरकाव करणाऱ्या गोव्याबाहेरील पक्षावर अजिबात विश्वास ठेवू नका. बाबी बागकर म्हणाले, काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचे हित जपणारा पक्ष आहे.

सचिन परब म्हणाले, अच्छेदिनाचा शंखनाद करून मतदारांना फसवून सत्तेवर आलेल्या भाजपने सर्वांचा विश्वासघात केला आहे. अशा विश्‍वासघातकी पक्षाला गाडण्याची वेळ आली आहे. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी केले. रामदास पांडे यांनी आभार मानले. मेळाव्याला 400 कार्यकर्ते उपस्थित होते.

गद्दारांना अद्दल घडवा : चोडणकर

सरकारने गोवा(Goa) विकायला काढला आहे. भाजप घोटाळ्यांचा पक्ष आहे, त्यांचे प्रत्येक कारनामे उघड केले जातील. आप, तृणमूल हा भाजपचा जुमला आहे. काँग्रसचे मतदान कमी करण्यासाठी त्यांचा हा डाव कदापि यशस्वी होऊ देऊ नका. भाजपने लोकांना लाचार बनवले, तसे आता प्रत्येक मतासाठी त्‍यांना लाचार करा. काँग्रेस पक्षाशी गद्दारी केलेल्या दयानंद सोपटे यांना योग्य धडा शिकवा, तसेच भाजपला सत्ताभ्रष्ट करा, असे आवाहन चोडणकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

SCROLL FOR NEXT